Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमMumbai Crime : मुंबईत वैमानिक तरुणीची आत्महत्या; प्रियकराला पोलिसांनी घातल्या बेड्या

Mumbai Crime : मुंबईत वैमानिक तरुणीची आत्महत्या; प्रियकराला पोलिसांनी घातल्या बेड्या

Subscribe

मुंबई : महिलांवरील वाढता अत्याचार हा मुंबईसह राज्यात चिंतेचा विषय ठरला आहे. अशामध्ये स्वप्ननगरी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये अनेकदा या अत्याचारांमुळे महिलांनी टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले आहे. अशामध्ये मुंबईतील अंधेरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली. अंधेरीमध्ये एका 25 वर्षीय पायलट तरुणीने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांना याची माहिती मिळताच तपास करत याचे धागेदोरे हाताशी धरून तिच्या प्रियकराला ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. (Mumbai Crime Young pilot take her life in her flat boyfriend arrested)

हेही वाचा : Raigad Politics : रायगडमध्ये पुन्हा रंगले कुरघोडीचे राजकारण, काठावर वाचलेल्यांना असं महेंद्र थोरवेंना का म्हणाल्या अदिती तटकरे 

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. 25 वर्षीय सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून काम करत होती. अंधेरी पूर्व येथील मरोळ येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारी सृष्टी ही मूळ उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची आहे. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (25 नोव्हेंबर) सृष्टी ही घरात मृतावस्थेत आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. अंधेरी पोलिसांना सकाळी 8 वाजताच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली, त्यानंतर महिलेचे पार्थिव घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरांनी मृत्यूचे कारण सांगितले.

डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात, सृष्टीचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले. तिने स्वतःच फाशी घेत आत्महत्या केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली की, पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. सृष्टीचा तिच्या प्रियकरासोबत वाद झाला होता, दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यातूनच ती त्रस्त होती, म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय यावेळी तिच्या जवळच्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आरोपी युवकाचे नाव आदित्य पंडित असून तो 27 वर्षांचा आहे. त्याच्याविरोधात कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -