मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराच आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. 28 ते 31 जानेवारी 2025 या काळात विशेष कारवाई करत कस्टम विभागाने कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, सोने तसेच हिरे जप्त केले. वेगवेगळ्या 6 प्रकरणांमध्ये 8 प्रवाशांना अटक केली आहे. यातील एका प्रकरणात 551.10 कॅरेट वजनाचे हिरे जप्त करण्यात आले. या हिऱ्यांची किंमत 93.85 लाख एवढी आहे. अन्य 3 प्रकरणात 1.549 कोटींचे 2.073 किग्रॅ. सोने या प्रवाशांकडून जप्त करण्यात आले आहे. स्पॉट प्रोफाइलिंगच्या आधारे कस्टम अधिकाऱ्यांनी रियाध आणि मस्कत येथून दोन प्रवाशांना अडवले. तपासादरम्यान बॅगेत सोन्याच्या लड्या तर सोन्याचा चुरा प्रवाशाच्या शरीरात सापडला. या दोघा प्रवाशाकडून 64.50 लाख रुपयांचे 863 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. (mumbai custom department action on csmia in smuggling case gold drugs diamond seized)
कस्टम अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बॅंकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाला अडवले. झडती घेतल्यानंतर प्रवाशाकडे 551.10 कॅरेटचा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत 93.85 लाख रुपये सांगितली जात आहे. प्रवाशाच्या शरीराचे स्कॅनिंग केल्यानंतर हिरा असल्याचा खुलासा झाला. कस्टम अधिकाऱ्यांनी बॅंकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांना विमानतळावर अडवले.
हेही वाचा – Crime News : पतीची किडनी विकली, आलेले पैसे घेऊन बायको प्रियकरासोबत पसार
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर केलेल्या या विशेष कारवाईत 50.16 कोटी रुपये किमतीचे 50.11 किलो हायड्रोपोनिक वीड, 93.8 लाख रुपये किमतीचे हिरे आणि 1.5 कोटी रुपये किमतीचे 2.073 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हायड्रोपोनिक विड ही एक प्रकारची नशा आहे. हे गांजाच्या श्रेणीत येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला खूप मागणी आहे. त्यामुळेच त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.
During 28-31 Jan, 2025, the officers at CSMIA,Mumbai, seized suspected Hydroponic Weed about 50.116 Kg having Illicit M.V of approx. 50.116 Cr., Diamond weighing 551.10 Carat v/a ₹93.85 Lakh & Gold weighing 2.073 Kg provisionally v/a ₹1.549 Cr. across 06 cases. 08 pax arrested. pic.twitter.com/KZ8lQtNQHs
— Mumbai Customs-III (@mumbaicus3) February 1, 2025
विमानतळावर तस्करी वाढली
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या महिन्यातच विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. या कारवाईत विमानतळावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात घेतले होते. ते दोघे तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेत असताना रंगेहात पकडण्यात आले. तपासादरम्यान सोन्याचे वजन 6.05 किलो असल्याचे उघड झाले, ज्याची बाजारातील किंमत 4.84 कोटी रुपये आहे.
हेही वाचा – Pending Dues : आमचे रखडलेले 89 हजार कोटी द्या, अन्यथा काम बंद करू, कोणी दिला सरकारला हा इशारा वाचा –