घरक्राइममनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील फ्रॉस्ट कंपनीची तब्बल १८५ कोटींची संपत्ती जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील फ्रॉस्ट कंपनीची तब्बल १८५ कोटींची संपत्ती जप्त

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईतील एका कंपनीची १८५ कोटी रुपयांची मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई करत जप्त केली आहे. १४ बँकांच्या समुहाची ३,५९२ कोटी रुपयांच्या फसवणूकीचे आरोप या कंपनीवर करण्यात आले आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल लि. असे या कंपनीचे नाव असून तिच्या सहयोगी कंपन्यांच्या मालमत्तेवरही ईडीने टाच मारली आहे. ग्लोबिझ एक्झिम प्रा.लि., एनएसडी निर्माण प्रा. लि., आणि आर.एस. बिल्डर्स असे सहयोगी कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांच्या प्रवर्तक आणि संचालकांच्या मालमत्ताही ईडीने जप्त केल्या आहेत. कानपूर, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकत्ता, आणि तामिळनाडूसह अनेक शहरांतील प्रवर्तक आणि संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्याचा आदेश ईडीने दिले आहेत.

यापूर्वीही गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सीबीआयने कंपनी आणि प्रवर्तकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरचं ईडीने ही कारवाई केली आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल कंपनीने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या रक्कम अनेक ठिकाणी वळवल्या. या वळविल्या रकमेतून समूहातील इतर कंपन्या व्यक्तींच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहे. असे ईडीने जाहीर केल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Kandivali Vaccine scam: कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी आरोपीला बारामतीतून अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -