Homeक्राइमSaif Ali Khan Attack : फिंगरप्रिंटचा अहवाल नाही, पण शरीफुलविरुद्ध भक्कम पुरावे...

Saif Ali Khan Attack : फिंगरप्रिंटचा अहवाल नाही, पण शरीफुलविरुद्ध भक्कम पुरावे – मुंबई पोलीस

Subscribe

सिनेअभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणार्‍या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्याविरुद्ध पोलिसांकडून भक्कम पुरावे असल्याचे दावा करण्यात आला आहे. परंतु अद्याप फिंगरप्रिंटचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई : सिनेअभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणार्‍या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्याविरुद्ध पोलिसांकडून भक्कम पुरावे असल्याचे दावा करण्यात आला आहे. परंतु अद्याप फिंगरप्रिंटचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. परमजित सिंह दहिया यांच्यासह पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. (Mumbai Police claim to have strong evidence against Shariful who attacked Saif Ali Khan)

परमजीतसिंह दहिया यांनी म्हटले की, शरीफुलविरुद्ध वांद्रे पोलिसांकडून भक्कम पुरावे आहेत. तो बांगलादेशी नागरिक आहे. त्याच्याकडे बांगलादेशी नागरिक असल्याचे काही दस्तावेज सापडले आहेत. त्यावरून तो बांगलादेशी असल्याचे उघडकीस झाले आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेने चांगला तपास केला आहे. शरीफुलकडून गुन्ह्यांतील कपडे, चाकूचा तुकडा तसेच इतर साहित्य जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

हेही वाचा – Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींच्या हत्येचे कारण आले समोर, शूटरने सांगितले का घेतला जीव

सैफ अलीच्या फ्लॅटमध्ये सापडलेले आणि आरोपी शरीफुल फिंगरप्रिंट मॅच झाले नसल्याचे काही वृत्त प्रसिद्ध झाले आहे, मात्र या वृत्ताचे दहिया यांनी आज खंडन केले. असा कुठलाही अहवाल अद्याप पोलिसांना आला नाही. आम्ही या अहवालाची प्रतिक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले. चोरीचा प्रयत्न फसल्यामुळेच त्याने सैफ अलीवर चाकूने हल्ला केला होता. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणीही मदत केली नाही. पोलीस कोठडीत असताना शरीफुलने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

बांगलादेशातून आल्यानंतर तो काही महिने कोलकाता येथे वास्तव्यास होता. त्याला कोणी मदत केली याबाबत काही लोकांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांची एक टिम अलिकडेच कोलकाता येथे गेली होती, अशी माहिती दहिया यांनी दिली. त्या पहाटे शरीफुल हा 2 वाजून 47 मिनिटांनी आला होता. हल्ल्यानंतर सैफ अली हा रुग्णालयात गेला होता. हल्ल्याची माहिती पोलिसांना खान कुटुंबियांकडून मिळाली नाहीतर तर लिलावती रुग्णालयातून मिळाली होती, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Solapur Crime : सोलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल