घरक्राइमएक कोटीच्या एमडी ड्रग्जसह नायजेरीयन नागरिकाला अटक

एक कोटीच्या एमडी ड्रग्जसह नायजेरीयन नागरिकाला अटक

Subscribe

मुंबई : सुमारे एक कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसहीत नायजेरीयन नागरिकाला मालवणी पोलिसांनी अटक केली. विक्टर ऑग्बोना असे या नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 750 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मालाड येथील मालवणीतील कच्चा रस्ता रोडवर काही विदेशी नागरिक एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री उशिरा तिथे विक्टर हा आला होता. तो कोणाची तरी वाट पाहत होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 750 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. तपासात विक्टर हा नायजेरीयन नागरिक असून तो सहा वर्षापूर्वी भारतात आला होता.

- Advertisement -

भारतात आल्यानंतर तो मुंबईत आला आणि त्याने ड्रग्ज तस्करीचा व्यवहार सुरु केला होता. याच प्रकरणात त्याला यापूर्वी तुळींज पोलिसांनी अटक केली होती. दोन महिने जेलमध्ये काढल्यानंतर तो अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. कोर्ट आणि जामिनासाठी त्याचे खूप पैसे खर्च झाले होते. ते पैसे वसुल करण्यासाठी तो पुन्हा ड्रग्ज विक्री करु लागला होता. त्यासाठी तो एमडी ड्रग्जचच्या डिलीव्हरीसाठी मालवणी परिसरात आला होता. मात्र ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच त्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.

त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये काही संशयित व्यक्तीचे नावे समोर आली आहेत. या सर्वांची आता पोलिसांकडून चौकशी होणार आहे. विक्टर हा ड्रग्ज तस्करीत कोणाच्या संपर्कात होता, त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, मालवणीत ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आला होता याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -