Homeक्राइमFraud : महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल 51 हजार कोटींची फसवणूक, आर्थिक घोटाळे करण्यात...

Fraud : महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल 51 हजार कोटींची फसवणूक, आर्थिक घोटाळे करण्यात हे शहर आघाडीवर

Subscribe

2024 हे वर्ष महाराष्ट्रासाठी आर्थिक फसवणुकीचे वर्ष ठरले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक समोर आली आहे. या फसवणुकीत पुणेकर दुसऱ्या नंबरवर आहेत. राज्यात गेल्या वर्षी टोरेस, मनी एज असे घोटाळे गाजले. अशा आर्थिक घोटाळ्यांमुळे अनेकांची मेहनतीची कमाई पाण्यात जाते.

Fraud in Mumbai : मुंबई : 2024 हे वर्ष महाराष्ट्रासाठी आर्थिक फसवणुकीचे वर्ष ठरले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक समोर आली आहे. या फसवणुकीत पुणेकर दुसऱ्या नंबरवर आहेत. राज्यात गेल्या वर्षी टोरेस, मनी एज असे घोटाळे गाजले. अशा आर्थिक घोटाळ्यांमुळे अनेकांची मेहनतीची कमाई पाण्यात जाते. (mumbai top in financial fraud cases in maharashtra worth rs 38 thousand crore reported in 2024)

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात आर्थिक फसवणुकीची 2 लाख 19 हजार 047 प्रकरणे समोर आली. तर एकट्या मुंबईत 38 हजार 872 कोटींची फसवणूक समोर आली आहे. राज्य गृहविभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक फसवणुकीच्या सर्वाधिक घटना या मुंबईत घडल्या आहेत. यात दुसऱ्या नंबरवर पुणे आहे. पुण्यात एकूण 22 हजार 059 कोटींचे घोटाळे समोर आले आहेत. तर संपूर्ण राज्यात 51 हजार 873 कोटींच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीशी संबंधित 42 हजार 802 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. पिंपरी – चिंचवडमध्ये 3221 कोटींची फसवणूक झाली. या सगळ्यात ठाणे जिल्हा कुठेही मागे नाही. ठाण्यात फसवणुकीच्या जवळपास 35 हजार 388 घटना नोंदवण्यात आल्या आहेत. ठाणे शहरात 20 हजारांपेक्षा जास्त घटना घडल्या. तर जिल्ह्यात एकूण 8 हजार 583 कोटींची फसवणूक झाली आहे.

मुंबईतील मीरा – भाईंदर आणि वसई – विरार भागातून फसवणुकीची 11 हजार 754 प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे लोकांना 1431 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. नागपुरात 11 हजार 875 प्रकरणे समोर आली. छत्रपती संभाजीनगरात 6090 प्रकरणे तर अमरावतीतून 2778 घटना दाखल झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात 3457 फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर बुलढाणा, चंद्रपूर, लातूर आणि अन्य काही जिल्ह्यातून अशाप्रकराच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिकच्या शहरी भागात आर्थिक फसवणुकीच्या 6381 तर ग्रामीण भागात 2788 घटना समोर आल्या आहेत. यात पीडितांनी 1047.32 कोटी रुपये गमावले.

एकंदरीतच आर्थिक फसवणुकीच्या घटना पाहता अधिकाऱ्यांनी लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तसेच आर्थिक व्यवहारांसंबंधी काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ सूचना देण्याचे आवाहन केले आहे.