घरक्राइमरॉबरीच्या उद्देशाने अंधेरीत वयोवृद्ध महिलेची हत्या

रॉबरीच्या उद्देशाने अंधेरीत वयोवृद्ध महिलेची हत्या

Subscribe

हत्येनंतर घरातील मुद्देमाल चोरी करुन मारेकरी पळून गेले.

मुंबईच्या अंधेरी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरी येथे राहणार्‍या गुलाबाी नारायण शेट्टी या 75 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी एका मुख्य आरोपीस डी. एन नगर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद तौफिक शेख असे या आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार या दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील रशेदुल आणि तौफिक यांनीच ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रॉबरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

अंधेरीतील वालिया कॉलेजसमोरील गणेश मंदिराच्या वरच्या मजल्यावर गुलाबी शेट्टी ही वयोवृद्ध महिला एकटीच राहत होती. 24 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता गुलाबी शेट्टी यांची त्यांच्याच घरी काही अज्ञात व्यक्तीनी प्रवेश केला. त्यांनी गुलाबीची साडीने गळा आवळून तिची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांच्या घरातील मुद्देमाल चोरी करुन मारेकरी पळून गेले. या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरु असतानाच रशेदुल शेख आणि नूरअली सत्तार यांना वांद्रे पोलिसांनी घरफोडीच्या एका गुन्ह्यांत अटक केली होती.

- Advertisement -

चौकशीत रशेदुल याने तौफिकच्या मदतीने गुलाबी शेट्टी यांची चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याची कबुली दिली. तौफिक हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. अखेर त्याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने या हत्येची कबुली दिली आहे. या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – बुटांवरून पटवण्यात आली हल्लेखोराची ओळख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -