घरक्राइमप्रेमप्रकरणातून तरुणीची तिक्ष्ण हत्याराने हत्या, गोवंडीतील घटना

प्रेमप्रकरणातून तरुणीची तिक्ष्ण हत्याराने हत्या, गोवंडीतील घटना

Subscribe

फौजिया आणि साहिल हे दोघेही एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी दुपारी ती गोवंडीतील झाकीर हुसैन नगर परिसरातून जात होती. यावेळी तिथे साहिल आला आणि त्यांच्यात कुठल्या तरी विषयांवर वाद सुरु झाला होता.

भररस्त्यात एका 18 वर्षांच्या तरुणीची तिच्याच परिचित आरोपी तरुणाने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी गोवंडीतील देवनार परिसरात घडली. फौजिया खान असे या हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी साहिल नावाच्या एका 20 वर्षांच्या हल्लेखोर तरुणाला देवनार पोलिसांनी अटक केली.

प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान आरोपीची चौकशी सुरु असून चौकशीनंतरच या घटनेमागील कारणाचा खुलासा होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांनी सांगितले. फौजिया आणि साहिल हे दोघेही एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी दुपारी ती गोवंडीतील झाकीर हुसैन नगर परिसरातून जात होती. यावेळी तिथे साहिल आला आणि त्यांच्यात कुठल्या तरी विषयांवर वाद सुरु झाला होता. यावेळी रागाच्या भरात साहिलने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार केले. त्यात ती जागीच कोसळली होती. हल्ल्यानंतर साहिल हा पळून गेला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांच्यासह देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisement -

रक्तबंबाळ झालेल्या फौजियाला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असतानाच तिचा सायंकाळी मृत्यू झाला. या हल्ल्यामागे साहिलचे नाव समोर आले होते. त्यामुळे पळून गेलेल्या साहिलला काही तासांत गोवंडी परिसरातून पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात साहिलचे फौजियावर प्रेम होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळाहून पळून गेला होता. रात्री उशिरा देवनार पोलिसांनी साहिलविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला शनिवारी सुट्टीकालिन लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरु होती. या हत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र चौकशीनंतर हत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांनी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -