बायकोचा पीपीई किटमध्ये भरला मृतदेह, पोलिसांना कळताच केलं रडण्याचं नाटक

शुक्रवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून आपली ड्यूटी बजावून घरी परतत होती. त्यानंर तिचा पीपीई किटमधला मृतदेह न्यू व्हिआयपी रोडवर सापडला.

murder of nurse by husband dead-body found in ppe kit in vadodara
बायकोचा पीपीई किटमध्ये भरला मृतदेह, पोलिसांना कळताच केलं रडण्याचं नाटक

कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेसनी सर्वाची सेवा केली. त्यांच्यासाठी पीपीई किट ही खूप महत्त्वाची वस्तू होती. पण त्याच पीपीई किटमध्ये एका नर्सचा मृतदेह आढळला आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किटमध्ये एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वडोदरातील गोत्री वैकुंठ सोसायटीजवळ या नर्सचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा पटेल नावाची ३९ वर्षीय महिला नर्स करौली बागच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होती. काही दिवसांपूर्वी गोत्री सिव्हिल कोविड १९ हॉस्पिटलमध्ये ड्यूटी करत होती. शुक्रवारी संध्याकाळी हॉस्पिटलमधून आपली ड्यूटी बजावून घरी परतत होती. त्यानंतर तिचा पीपीई किटमधला मृतदेह न्यू व्हिआयपी रोडवर सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सच्या पीपीई किटमधील मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस तिच्या घरी पोहचले. त्यावेळी शिल्पाचा नवरा जयेश घरी होता. शिल्पाचा मृतदेह पाहून त्याने रडण्याचे नाटक करायला सुरूवात केली. त्यांच्या हातावर रक्ताचे डाग बघून पोलिसांना जयेशचा संशय आला. पोलिसांनी जयेशला संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईनंतर जयेशने आपण बायकोचा खून केल्याचे कबूल केले.

आपल्या नर्स बायकोची हत्या करण्याआधी जयेश आणि शिल्पामध्ये जोरदार भांडण झाले होते. घरगुती भांडणाला कंटाळून आरोपी जयेशने बायकोची डोक्यात जड वस्तू घालून हत्या केली. कोणाला संशय येऊ यासाठी शिल्पाचा मृतदेह पीपीई किटमध्ये भरून कारमधून शहराच्या दुसऱ्या भागात फेकून दिला. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. भांडणाला कंटाळून शिल्पाने आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली.


हेही वाचा – जुगार खेळणाऱ्या महिलांच्या टोळीवर छापा,३८ हजारांचा माल जप्त