Eco friendly bappa Competition
घर क्राइम आर्थिक वादातून ३५ वर्षाच्या तरुणाची हत्या

आर्थिक वादातून ३५ वर्षाच्या तरुणाची हत्या

Subscribe

आर्थिक वादातून ३५ वर्षाच्या तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना डोंगरी परिसरात घडली आहे.

आर्थिक वादातून विशाल पारील या ३५ वर्षाच्या तरुणाची पाच जणांच्या एका टोळीने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना बुधवारी डोंगरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या पाचही आरोपींना डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता डोंगरीतील नौरोजी हिल रोड, नंबर क्रमांक पाच, सेंट जोसेफ चर्चमागे घडली.

नेमका काय झाला वाद?

डोंगरीतील नौरोजी हिल रोड परिसरात विशालसह इतर पाचही आरोपी राहतात. ते सर्वजण एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात पैशांवरुन वाद सुरु होता. बुधवारी सायंकाळी विशाल आणि त्यांच्यात पैशांवरुन पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर या पाच जणांनी विशालला हाताने तसेच बांबूने बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या पाठीला, छातीला, दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. जखमी झालेल्या विशालला तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गणेश कांबळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पाचही आरोपींना काही तासांत पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील मोठा ड्रग्ज सप्लायर परवेज खानला अटक


- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -