घर क्राइम भाजपा कार्यकर्त्या सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता; घातपाताचा संशय

भाजपा कार्यकर्त्या सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता; घातपाताचा संशय

Subscribe

नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या आहेत. सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या 1 जुलैपासून सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूरमधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.

नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या आहेत. सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या 1 जुलैपासून सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूरमधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपुरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या आणि 1 जुलैनंतर त्या नागपुरात परतल्याच नसल्याची माहिती मिळत आहे. ( Nagpur BJP activist Sana Khan missing since August 1 Murder Suspected by her business partner Sahoo  )

सना खान या पश्चिम नागपुरातील स्थानिक कार्यकर्त्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. बिझनेस पार्टनरने त्यांचा खून केल्याचा तर्क लढवला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप सना खान यांचा मृतदेह मिळालेला नाही, त्यामुळे या तर्काला कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, जबलपूरमध्ये सना खान यांचा साहू नावाचा बिझनेस पार्टनर आहे, जो या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. सना खान 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या आणि दुसऱ्या दिवसापासून त्या बेपत्ता आहेत. साहूचा जबलपूरमध्ये ढाबा आहे. 1 ऑगस्टपासून सना यांच्याशी संपर्क न झाल्यानं संशय वाढला आणि त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी मानकापूर पोलिसांत दाखल केली.

( हेही वाचा: चिंताजनक! शहरात एकाच दिवशी एका अल्पवयीन मुलासह दोन तरुणांची आत्महत्या )

पोलिसांनी काय सांगितलं?

- Advertisement -

आम्ही कुटुंबियांच्या तक्रारीवरून सना खान बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. आमचं पथक जबलपूरला रवाना झालं आहे, परंतु सध्या तरी सना खान यांचा शोध लागलेला नाही. तसंच त्यांचा मृत्यू अथवा खून झाल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे त्या जीवंत आहेत किंवा नाहीत याबाबत भाष्य करू शकत नाही. आमचा तपास सुरू आहे, अशी माहिती मानकापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली.

सध्या सना खान यांचा बिझनेस पार्टनर साहू हा त्याच्या ढाब्यातील कर्मचाऱ्यांसह पसार झाला आहे. पोलीस त्याच्या मूळगावात देखील पोहोचले पण तिथेही तो सापडला नाही. साहूची पत्नी ही जबलपूर पोलिसांत आहे. परंतु आम्ही एकत्र नसून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचं तिने म्हटलं आहे. सध्या पोलिसांकडून पार्टनर साहू याचा शोध सुरू आहे. त्यानंतरच अधिकची माहिती समोर येणार आहे.

- Advertisment -