घरक्राइमअभ्यासासाठी तगादा लावला, मग मुलीने कराटे बेल्टने केली आईची हत्या

अभ्यासासाठी तगादा लावला, मग मुलीने कराटे बेल्टने केली आईची हत्या

Subscribe

अभ्यासाचा तगादा लावल्याने एका अल्पवयीन मुलीने कराटे बेल्टने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. ३० जुलै रोजी ऐरोलीतील राकेश सोसायटीत ही घटना घडली. विशेष म्हणजे या आरोपी मुलगी अवघ्या १५ वर्षाची आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्य़ासाठी पीडित आई मुलीला वारंवार सांगत होती. यामुळे दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात मुलीला राग अनावर झाल्याने तिने आईची हत्या केल्याचे समोर आलं आहे.

आईच्या हत्यानंतर मुलीने बेडरुमचा दरवाजा बंद करत आईने आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आईच्या मोबाईलवरून आपल्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचे मेसेज पाठवल्याचे तपासादरम्यान आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत आईचे नाव शिल्पा जाधव असे आहे.

- Advertisement -

आईची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी सदर मुलीने बेडरुमचा दरवाजा आतुन बंद करुन, आईच्या मोबाईल फोनवरुन आपल्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतप सर्व प्रकार उडकीस आला.

रबाळे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलाने तीन दिवसांपूर्वी आईविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांना संपर्क साधला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलवलं होतं.

- Advertisement -

मुलीने डॉक्टर व्हावे अशी मृत आईची इच्छा होती. यासाठी मुलीला मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावला होता. तसेच मुलीने नीट परीक्षेची तयारी यासाठी मृत महिला तिच्या मागे लागली होती. या अभ्यासामुळे आई आणिमुलीमध्ये नेहमीचं भांडण होत होते. ३० जुलैला दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. यावेळी मुलीने आईला जोरात धक्का दिला. ज्यामुळे त्या खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली.

या मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवल आईने आत्महत्या केल्याचे भासवले आणि आईच्या मोबाईवरून मामाला मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये, ‘मी सर्व प्रयत्न केले की, मी सर्व प्रयत्न केले, पण आता माघार घेते,’ असे मुलीने लिहिले होते, अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली आहे.

यावेळी जवळच राहणाऱ्या आरोपी मुलीच्या मामा घेत बेडरुमचा दरवाजा तोडला, यावेळी बहिणीचा मृतदेह पडल्याचे व तिच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे निदर्शनास आले

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनात शैला जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे व गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता, तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मुलीवर हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Maharashtra CET Exam 2021: : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -