मुंबईत NCB ची मोठी कारावाई, २ ड्रग पेडलर्ससह ५० लाखांचे ड्रग्स जप्त, दोन अधिकारी जखमी

NCB raid at Belapur Navi Mumbai in the based of investigation action against Cruise Drugs Party
NCB Raid: क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाई नंतर NCBची नवी मुंबईतल्या बेलापूर येथे छापेमारी

ड्र्ग्स विक्री आणि तस्क्ररी प्रकरणात एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील डोंगरी, खारघर या दोन भागांमधून एनसीबीने दोन ड्र्ग्स पेडलर्सला बेड्या ठोकल्या आहे. या ड्र्ग्स पेडलर्स आरोपींमधील एक आरोपी नायजेरियन आहे. या दोघांकडून एनसीबीने ५० लाख रुपयांचे कोकेन ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीच्या या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्स तस्करी आणि विक्रीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. या कारवाईदरम्यान एनसीबीच्या २ अधिकाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील खारघर आणि डोंगरी भागात दोन ड्रग्स पेडलर्स येणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने दोन्ही ड्रग्स पेडलर्सला अटक करण्यासाठी सापळा रचला. या सापळ्याच्या नियोजनानुसार खारघर आणि डोंगरी भागात ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन ड्रग्स पेडलर्स एनसीबीच्या हाती लागले. या दोन ड्रग्स पेडलर्समध्ये एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. या दोघांकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ५० लाख रुपये किंमतीचे कोकेन ड्रग्स जप्त केलं आहे.

या कारवाईदरम्यान दोन्ही ड्रग्स पेडलर्सनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी अटक करताना एनसीबी अधिकारी आणि ड्रग्स पेडलर्समध्ये झटापट झाली. या झटापटीत एनसीबीचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.


…आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूद पुढे सरसावला