Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमNCB Drugs Seized : एनसीबीची मोठी कारवाई; मुंबईत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक

NCB Drugs Seized : एनसीबीची मोठी कारवाई; मुंबईत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक

Subscribe

गेल्या काही दिवसात सातत्याने अमली पदार्थ सापडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अलर्ट मोडवर असलेल्या एनसीबीने आता मोठी कारवाई करत 200 कोटींच्या किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच ड्रग्ज तस्करी प्रकरणी चौघांना अटकही केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसात सातत्याने अमली पदार्थ सापडण्याच्या घटना घडत आहेत. यातच अनेकदा मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) याआधी सांगली, पुणे आणि नवी मुंबईतूनही ड्रग्ज जप्त केले आहे. अशावेळी मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करी करणारी एक आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे अलर्ट मोडवर असलेल्या एनसीबीने आता मोठी कारवाई करत 200 कोटींच्या किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच ड्रग्ज तस्करी प्रकरणी चौघांना अटकही केली आहे. (NCB seizes drugs worth Rs 200 crore in Mumbai arrests four)

गेल्या आठवड्यात एनसीबीने सांगली जिल्ह्यात ड्रग्ज निर्मित्तीचा कारखाना उद्ध्वस्त करत तीन जणांना अटक केली होती.  यानंतर 31 जानेवारी रोजी नवी मुंबईतून 11.540 किलो उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा, 200 पॅकेट कॅनॅबिस गमी आणि 1,60,000 रुपये रोख जप्त केली होती. यानंतर आता मुंबई एनसीबीने 11.5 किलो ग्रॅम उच्च श्रेणीचे कोकीन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक, 200 पॅकेट (5.5 किलोग्राम) गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई स्थित एका आंतरराष्ट्रीय कुरियर एजन्सीवर कारवाई करत ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Accident News : अपघातात दहा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, बाईकस्वारासह मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

एनसीबीने सांगितले की, मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीकडून सुरुवातीला ड्रग्जचे एक पार्सल सापडले होते. हे पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते. यासंदर्भात पुढे तपास केला असता नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. भारतातील एका व्यक्तीकडून ड्रग्सचे सिंडीकेट चालवण्यात येत असून विदेशात राहणाऱ्या लोकांचा एक समुह सक्रीय आहे. हा समुह अमेरिकेतून मुंबईसह भारतातील अनेक राज्यात आणि विदेशात कुरिअरद्वारे ड्रग्जचा पुरवठा करतो. याप्रकरणी, एक आरोपी भारतात नाव बदलून राहत असून तो ड्रग्ज व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी एका विशिष्ट कोडवर्डमधून विदेशातील लोकांसोबत संवाद साधत आहे. त्यामुळे आता ड्रग्स रॅकेटप्रकरणी देश आणि विदेशातील व्यक्तींचा तपास केला जात आहे, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.

हेही वाचा – Bengaluru Crime : अभिनेत्री प्रेमिकेसाठी बांधला बंगला, पण पोलिसांनी ठोकल्या बेड्या