चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आजी आजोबांना १० वर्षाची शिक्षा

शेजारी राहणाऱ्या आजी आजोबाने एका चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

touching child cheek without sexual intent not offence says mumbai court
एका गुन्ह्यातून आरोपीची सुटका होताच असं काही झाले की...

महाराष्ट्रातील एका न्यायालयाने चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ऐंशी वर्षाच्या दाम्पत्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण २०१३ सालचे असून पॉ्क्सो अंतर्गत या दोन्ही पती पत्नीना दोषी ठरवण्यात आले आहे. या दोघांना पिडीत मुलगी आजी आजोबा बोलायची. पोलिसांना पीडितेने दिलेल्या जबाबानुसार ४ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी शाळेतून घरी आल्यावर ती बिल्डींगमध्येच चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एका मैत्रिणीकडे खेळायला गेली. पण ती झोपल्याने पिडीता पुन्हा घरी आली. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या आजी आजोबांनी तिला आपल्या घरी खेळावयास बोलावले. त्यानंतर आजीने तिला घरातील एका झोपाळ्यावर जबरदस्तीने बसवले व आजोबांनी तिचे कपडे काढले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

याप्रकारामुळे घाबरलेल्या पिडीतेने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे आजी आजोबा घाबरले त्यांनी तिला गप्प राहण्याची धमकी दिली व तिच्या तोंडावर थुंकले. पण पिडीतेने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. त्यानंतर तिने घरी गेल्यावर आईला सगळा प्रकार सांगितलात्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. नंतर दोघा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली..


हे वाचा- Mansukh Hiren Death Case : सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली