Mumbai Crime : चर्चगेटमध्ये नायजेरियनचा आठ जणांवर चाकू हल्ला

nigerian youth knife attack on 15 people in mumbai high court area police arrest accused
चर्चगेटमध्ये नायजेरियन माथेफिकूचा आठ जणांवर चाकू हल्ला, पोलिसांकडून अटक

मुंबईच्या चर्चगेट परिसरात महिलेसोबत झालेल्या वादानंतर एका नायजेरियन व्यक्तीने टाटा गार्डनमध्ये झोपलेल्या आठ जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज दुपाराच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे चर्चगेट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या नायजेरियन आणि आठ जणांवर जे. जे. आणि जी. टी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आझाद मैदान पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून पोलीस तिची चौकशी करत आहेत. (Knife Attack)

जॉन हा नायजेरियन व्यक्ती काही वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. (Attack On People) तो बुधवारी दुपारी 4.00 च्या सुमारास एका महिलेसोबत टाटा गार्डन येथे बसला होता. यावेळी जॉनने नशा केली होती. नशेत असतानाच त्याचा एका महिलेसोबत वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या जॉनने टाटा गार्डनमध्ये झोपलेल्या आठ जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. याची घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर जॉनला ताब्यात घेतले.

हेही वाचा : कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

तसेच जखमी झालेल्या आठ जणांना उपचारांसाठी तात्काळ जे. जे. आणि जी. टी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात आरोपी जॉन हा देखील जखमी झाला असून त्याच्यावरही जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेमका हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आझाद मैदान पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तिच्या चौकशीनंतर नेमका वाद कशामुळे झाला आणि जॉनने हल्ला का केला हे स्पष्ट होणार आहे. पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहेत. (Mumbai Police)


हेही वाचा :  HSC, SSC Board Result 2022 : पुढील आठवड्यात 12 वी, तर शेवटच्या आठवड्यात 10 वी चा निकाल