Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम ऑक्सिजनचा काळाबाजार! नागपूर रोडवरून ६२ सिलेंडर जप्त

ऑक्सिजनचा काळाबाजार! नागपूर रोडवरून ६२ सिलेंडर जप्त

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अनेक भागात या संधीचा फायदा घेत ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार सुरु झाला आहे. दरम्यान कारंजा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर रोडवरही तब्बल ६२ ऑक्सिजन सिलेंटरचा काळाबाजार सुरु होता. परंतु यावर कारंजा पोलिसांनी कारवाई करत ६२ ऑक्सिजन सिलेंडर ताब्यात घेतले आहेत.

कारंजा- नागपूर रोडवरून हिंदुस्तान स्केप येथे एका बोलरो गाडीतून ट्रकमध्ये अवैध्यरित्या ऑक्सिजन सिलेंडर भरणे सुरु होते. यावेळी शहरात पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना काहीतरी गैर सुरु असल्याची शंका आल्याने त्यांनी गाडीची चौकशी केली, तसेच बोलेरो गाडीची तपासणी केली असता बोलेरोमध्ये २९, तर ट्रकमध्ये २६ रिकामी ऑक्सिजन सिलेंडर आढळून आले.

- Advertisement -

यावर झोयानदर येथे राहणारा सदर दुकानदार मालक रियाज अहमद गुलाम रसूल (४०)यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर व्यवसायाचे त्यांच्याकडे लायसन्स असल्याचे सांगितले. तसेच हे सिलेंडर नागपूरहून खरेदी केल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी कागदपत्रांची छाननी केली असता हे सिलेंडर जवाहर हॉस्पिटल कारंजा यांच्या नावे खरेदी केल्याचे दिसून आले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित दुकानादाराकडून समाधानकारक उत्तर आले नाही. त्यामुळे कारंजा पोलिसांनी ट्रकसह सर्व सिलेंडर जप्त केले आहे. तसेच अधिक चौकशी पोलिस करत असून याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना दिली जाणार आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -