घर क्राइम पालघर झेडपी : राष्ट्रवादी काँग्रस सदस्य हबीब शेख यांना अटक; वाचा, नेमके प्रकरण काय

पालघर झेडपी : राष्ट्रवादी काँग्रस सदस्य हबीब शेख यांना अटक; वाचा, नेमके प्रकरण काय

Subscribe

डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या मोखाडा तालुक्यातील आसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य, जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन व निलेश सांबरे यांचे खंदे समर्थक हबीब शेख यांना शासनाची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे.

पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर बनावट सह्या करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावीत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने हबीब शेख यांना अटक केली आहे. हबीब शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी वर्गाने दिली.

- Advertisement -

मोखाडा विभागातील मोखाडा खोडाळा विहीगाव राज्यमार्ग ७८ रस्त्यासाठी खासदार यांनी मागणी केल्यानुसार शासनाकडून १० कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली होती. या कामाच्या मंजुरी करिता सार्वजनीक बांधकाम विभागाकडे खासदारांनी विचारणा केली असता मंजूर झालेल्या कामाचा पाठपुरावा व त्याकरीता लागणारे कागदपत्रे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख यांनी सादर केल्याची धक्कादायक माहिती खासदारांना मिळाली.

या प्रकाराविषयी खासदार राजेंद्र गावित यांनी माहिती जाणून घेतली. तेव्हा शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही कामासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आले. हबीब शेख यांनी बनावट लेटरहेड तयार करून त्यावर राजेंद्र गावित यांच्या बनावट सहीचा चुकीचा वापर केला. विशेष म्हणजे या बनावट सहीवर मुख्यमंत्री कार्यालयाची टिप्पणी असल्याचे समजते. त्यामुळे लोकप्रतिनिधींची व सरकारची दिशाभूल करून शासनाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हबीब शेख यांच्यावर पालघरमध्ये गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना अटक केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -