Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमPanvel : आधी आईने 8 वर्षाच्या मुलीला 29 मजल्यावरून फेकले नंतर केली आत्महत्या, घटनेने पनवेल हादरले

Panvel : आधी आईने 8 वर्षाच्या मुलीला 29 मजल्यावरून फेकले नंतर केली आत्महत्या, घटनेने पनवेल हादरले

Subscribe

पनवेल : पनवेलमधली एका उच्चभ्रू सोसायटीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या ८ वर्षाच्या मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकत तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण पनवेल हादरले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. या चोकशीदरम्यान, सदर महिला ही मानसिक अवस्था चांगली नसल्याचे समोर आले आहे. तरीही पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे. (Panvel Crime woman jumps from 29 th floor after throwing 8 year old daughter)

हेही वाचा :  CM Fadnavis : खोक्या असो की बोक्या – ठोक्या, सर्वांना ठोकणार; मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारांना स्पष्ट संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, पळस्पे फाटा परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉनमधील औरा या मोठ्या टॉवरमध्ये ही घटना घडली आहे. या इमारतीच्या 29 व्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबामध्ये आशिष दुवा हे त्यांची पत्नी मैथिली दुवा आणि ८ वर्षीय मुलगी मायरासोबत राहतात. या घटनेनंतर आशिष दुवा यांनी पोलिसांना माहिती दिली की, आधी ८ वर्षीय मायरा 29 व्या मजल्यावरून खाली पडली. या प्रसंगाने हादरलेले आशिष दुवा हे तिला पाहण्यासाठी खाली धाव घेतली. त्यानंतर क्षणार्धातच त्यांची पत्नी मैथिलीदेखील 29व्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेमध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

चौकशीदरम्यान आशिष दुवा यांनी पोलिसांना माहिती दिली की, आशिष यांची पत्नी मैथिली ही मानसिकदृष्ट्या ठिक नव्हती. त्यातूनच तिने ८ वर्षाच्या मायराला घराच्या बेडरूममधील खिडकीतून खाली फेकले. त्यानंतर तिने स्वतः तिथून खाली उडी मारली आणि स्वतःचे जीवन संपवले. अशामध्ये या घटनेनंतर आता अनेक चर्चा समोर येत आहेत. शेजारांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. या वादातूनच पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे अधिक तपास करत आहेत.