(Penalty to Indian) कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील पर्थ विमानतळावर भारतीय व्यक्तीने एका महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्याने प्रथम महिलेच्या श्रीमुखात लगावली, नंतर तिचा गळा पकडून तिला जमिनीवर पाडले आणि लाथ मारली. जवळच असलेल्या दोन लोकांनी त्याला रोखले. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस (AFP) अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. पीडित महिला कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले. (Attack on female employee at Australian airport)
पर्थ विमानतळावरील चेक-इन काऊंटरजवळ 25 फेब्रुवारी 2025 रोजी ही घटना घडली. 43 वर्षीय भारतीय व्यक्ती बालीकडे जात होता, पण त्याच्या वर्तनामुळे त्याला विमानात चढू दिले गेले नाही. याचा त्याला राग आला. तो तिथून निघाला, पण परत येऊन त्याने काऊंटरवरून पलीकडे उडी मारली आणि त्याने त्याने महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. 6 मार्च 2025 रोजी पर्थ न्यायालयाने हल्ल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवून पीडितेला 7 हजार 500 ऑस्ट्रेलियन डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम त्याला साडेसात महिन्यांत अदा करायची आहे, असे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे.
A traveller has pleaded guilty in court to a rage-fuelled attack on a worker at Perth Airport late last month. The 43-year-old Indian national first became aggressive while waiting to check in for his flight to Bali on February 25, the Australian Federal Police said on Tuesday.… pic.twitter.com/4Dzpg46tzP
— 7NEWS Australia (@7NewsAustralia) March 12, 2025
विमानतळ परिसरात कर्मचाऱ्यांशी किंवा कोणत्याही प्रवाशाशी हिंसक किंवा गैरवर्तन करणाऱ्यांबाबत झीरो टॉलरन्सचे धोरण आहे. “कोणीही ड्युटीवर असलेल्या व्यक्तीला हिंसाचार किंवा आक्रमकतेला सामोरे जावे लागू नये, याला प्राथमिकता असल्याचे एएफपीचे कार्यवाहक अधीक्षक एव्हिएशन शोना डेव्हिस यांनी सांगितले. कायदा मोडणाऱ्यांवर खटला चालवण्यास एएफपी मागेपुढे पाहात नाही आणि विमानतळांवर गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – Jaffar Express : पाक सैन्याकडून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा, पण बीएलए म्हणते…