Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मास्क विचारला म्हणून पोलिसांवरच सोडला कुत्रा, दादागिरी आली अंगलट

मास्क विचारला म्हणून पोलिसांवरच सोडला कुत्रा, दादागिरी आली अंगलट

Related Story

- Advertisement -

शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून घराबाहेर पडताना मास्क वापर असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र काही नागरिक विना मास्क रस्त्यावर, सार्वजिनक ठिकाणी वावरताना दिसतायत. यामुळे पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासानाकडून अशा नागरिकांवर कडक कारावाई आणि दंड ठोठावला जात आहे. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत हल्ला केल्याचा घटना घडत आहेत. दरम्यान डोंबिवलीत विना मास्क फिरणाऱ्या तीन तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुत्र्याने हल्ला केल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाल आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कल्याण- डोंबिवलीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खंबाळपाडा रोडवर महापालिका व पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई सुरू होती. याचदरम्यान गणेश ऑटोमोबाईल नावाचा गॅरेजबाहेर तीन तरुण विनामास्क बसले होते. यावेळी पोलिसांनी मास्क न घातल्याप्रकरणी तिघांना पाचशे पाचशे रुपयांचा दंड भरण्यास सांगितला परंतु तिघांनीही दंड भरण्यास नकार देत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर पोलिसांना धक्काबुक्की करत रस्त्यावरील पाळीव कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. या कुत्र्याचा हल्ल्यात पोलीस कर्मचारी अनिल तायडे यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता, आदित्य गुप्ता या तिघांविरोधात गुन्हा दाख केला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून आदित्य गुप्ताचा पोलीस शोध घेत आहेत.


 

- Advertisement -