Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम तुम्हालाही कुणी रेल्वे नोकरीचं आश्वासन दिलंय? मग तुम्ही फसवले जाताय!

तुम्हालाही कुणी रेल्वे नोकरीचं आश्वासन दिलंय? मग तुम्ही फसवले जाताय!

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात हजारो लोकांचे रोजगार गेले. तसेच, नवीन रोजगार निर्माण होण्याची प्रक्रिया प्रचंड संथ झाली. या पार्श्वभूमीवर अनेक बेरोजगार तरूण नव्या रोजगाराच्या शोधात असताना अशा बेरोजगारांना फसवणाऱ्या टोळक्याचं फावत असल्याचं दिसून आलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून एका भामट्याला अटक केली असून अशा प्रकारे रेल्वेमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्याने तब्बल २३ जणांना १ कोटीहून अधिक रकमेला फसवलं असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलीप कुमार जगदीशप्रसाद सिन्हा नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर भादंवि कलम ४२० अर्थात फसवणुकीच्या गुन्ह्यासह इतरही अनेक गुन्ह्यांची नोंद केली आहे.

अशा प्रकारे फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आर्थिक गुन्हे विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वडोदऱ्यातून दिलीप सिन्हाला अटक केली. त्याच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार दिलीप सिन्हाने एकूण २३ जणांना अशाच प्रकारे फसवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या विरोधात तक्रार देणाऱ्या एका तक्रारदारानुसार सिन्हाने गेल्या २ वर्षांत त्याला रेल्वेमध्ये नोकरी देणार असल्याचं सांगून अनेकदा त्याच्याकडून पैसे लाटले होते. शिवाय त्याला रेल्वेचं बनावट अपॉइंटमेंट लेटर देखील दिलं होतं.

- Advertisement -

गेल्या २ वर्षांपासून दिलीप सिन्हा फरार होता. अखेर वडोदरामधून त्याला अटक करण्यात आली. त्याने नवी मुंबई, गुजरात, झारखंडमधल्या नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक बेरोजगारांना अशाच पद्धतीने फसवल्याची देखील माहिती मिळत आहे.

- Advertisement -