घरक्राइमगळ्यावर धारदार शस्राने वार करुन पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची दगडाचे ठेचून हत्या

गळ्यावर धारदार शस्राने वार करुन पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची दगडाचे ठेचून हत्या

Subscribe

घटनास्थळी सुदर्शनच्या खिशात असलेल्या पाकिटावरुन त्याची ओळख पटवण्यात आली. मात्र त्याच्या हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आधी तरुणाचा धारदार शस्राने गळा चिरण्यात आला. त्यानंतर त्याला दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबुराव पंडित असे मृत तरुणाचे नाव आहे. सुदर्शनची हत्या करुन त्याचा मृतदेह पुण्याच्या सूस खिंडीत टाकण्यात आला. घटनास्थळी सुदर्शनच्या खिशात असलेल्या पाकिटावरुन त्याची ओळख पटवण्यात आली. मात्र त्याच्या हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे सुदर्शनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

सुदर्शन हा ३० वर्षींय तरुण पुण्याच्या चतु:श्रृंगी परिसरातील राष्टीय रासायनिक प्रयोगशाळेत पीचडीचे शिक्षण घेत होता. सुदर्शनचे मुळ गाव हे जालना जिल्ह्यातील जाफारबाद आहे. पीएचडीच्या अभ्यासाठी पुण्याच्या सुरतवाडी परिसरात मागील दीड वर्षांपासून सुदर्शन पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. त्याच्या हत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.सुदर्शनसारख्या अभ्यासू मुलाच्या बाबतीत असा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

सुदर्शनचा खून करणाऱ्याने कोणताही पुरावा सापडू नये म्हणून सुदर्शनचा चेरहा दगडाने ठेचून विद्रुप केला. त्यानंतर मृतदेह सूस खिंडीत टाकून आरोपीने तिथून पळ काढला. सुदर्शनच्या चुलत भावाने संबंधित घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सुदर्शनच्या हत्येची तक्रार नोंदवण्यात आली. सुदर्शनचा संशयास्पद मृत्यूमुळे सर्वच घाबरले आहेत. त्याच्या हत्येमागचे कारण शोधून काढण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच घेतला गळफास

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -