घरक्राइमPune Crime : शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचे मोबाईलवरून लपवून केले चित्रीकरण; 16 वर्षांच्या...

Pune Crime : शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचे मोबाईलवरून लपवून केले चित्रीकरण; 16 वर्षांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

16 वर्षाच्या मुलाला शिकवणीसाठी शक्षिका घरी यायची. शिकवण्यासाठी (Tuition Classes) घरी आलेली शिक्षिका जेव्हा बाथरूममध्ये गेल्यावर 16 वर्षाच्या मुलाने लपवून त्याचे चित्रीकरण केले आहे.

पुणेः शिक्षिकेचं मोबाईलवरून अश्लील चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एक 16 वर्षांच्या मुलाच्या घरी शिक्षिका शिकवणीसाठी येत होतीत. शिकवण्यासाठी (Tuition Classes) घरी आलेली शिक्षिका जेव्हा बाथरूममध्ये गेली, त्यावेळी लागलीच संधी साधत 16 वर्षांच्या मुलाने लपून त्या शिक्षिकेचं अश्लील चित्रीकरण केले. हा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला असून, चित्रीकरण करणारा हा मुलगा दहावीमध्ये शिकत आहे. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी एक खासगी शिक्षिकेची शिकवणी ठेवली होती. ही शिक्षिका या मुलाला 10 ते 11 वर्षांचा असल्यापासून इंग्रजी शिकवत होती. ती पाच वर्षांपासून त्याला इंग्रजी विषय शिकवणीसाठी येत होती.

कोथरूडमधील ही शिक्षिका त्याच्या घरी शिकवायला जायची. काल जेव्हा ती त्याच्या घरी शिकवणीसाठी गेली आणि त्याच्या घरातील बाथरूमचा (Bathroom) वापर केला, तेव्हा त्यांना त्या बाथरूममधील साबणाच्या खोक्यामागे काही तरी चमकल्याचे दिसले. तेव्हा तो खोका बाजूला केल्यावर त्याच्या पाठीमागे मोबाईल लपवल्याचे दिसले आणि या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू असल्याचे त्या शिक्षिकेला आढळून आले. त्यानंतर त्या शिक्षिकेने त्या मुलाच्या नकळत तो मोबाईल तिच्या घरी घेऊन गेली आणि तो मोबाईल पूर्ण तपासला. हा मोबाईल पूर्ण तपासला असता त्यामध्ये जे काही बघितलं त्यानं त्या शिक्षिकेला धक्का बसला. त्या मोबाईलमध्ये तिचे आधीचे बाथरूममधील केले गेलेले चित्रीकरण आणि त्याचबरोबर आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटोही त्या मोबाईलमध्ये आढळून आले आहे.

- Advertisement -

या शिक्षिकेने त्यानंतर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन 16 वर्षांच्या मुलाची तक्रार नोंदवली आहे. या मुलाविरोधात पोलिसांनी आयटी एक्ट (IT Act) नुसार गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर या मुलाला बालकल्याण विभाग (Child Welfare Department) अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे. मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याला काय शिक्षा देणार हे येत्या काळात समजणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -