Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम हत्या करुन पळालेल्या आरोपीला पोलिसांनी १९ वर्षांनी ठोकल्या बेड्या

हत्या करुन पळालेल्या आरोपीला पोलिसांनी १९ वर्षांनी ठोकल्या बेड्या

Related Story

- Advertisement -

क्षुल्लक कारणावरून रूम पार्टनरची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला १९ वर्षानंतर ठाण्यातील विटावा येथून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक करून त्याचा ताबा डोंबिवली पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे वय सध्या ६५ वर्षे असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

एच.राजाराम राजू शेट्टी असे १९ वर्षांनी मिळून आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा कर्नाटक राज्यातील उडपी येथील एच.राजाराम हा सध्या रायगड जिल्हयातील एका फार्महाउसवर नोकरीला होता. १९ वर्षांपूर्वी एच.राजाराम आणि सी.जे.रेगो हे दोघे डोंबिवली पूर्व येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. छोटेमोठे कामधंदा करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या या दोघांमध्ये घराच्या भाड्यावरून ८ मे २००१ रोजी वाद झाला होता. या वादातून एच.राजाराम याने सी.जे.रेगो याच्या डोक्यात फरशी टाकून हत्या करून पळून गेला होता. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी एच. राजाराम याचा अनेक वर्षे शोध घेण्यात आला होता मात्र तो मिळून येत नव्हता.

- Advertisement -

ठाण्यातील विटावा या ठिकानी एका हत्येतील फरार आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गन्हे शाखेला मिळाली होती, या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलीसानी सकाळी सादर ठिकणी सापळा रचून एच.राजाराम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने १९ वर्षांपूर्वी डोंबिवली येथे रूम पार्टनरची हत्या केल्याची कबुली गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेने एच. राजाराम याला अटक करून पुढील तपासासाठी त्याचा ताबा डोबिवली पोलिसांकडे देण्यात आला आहे. एच.राजाराम याला २००१ साली झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करून त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

- Advertisement -