महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आकाश ठुबे असे मृताचे नाव असून तो वसंत विहार परिसरात राहणारा आहे. पैशाच्या वादातून 29 ऑगस्ट रोजी जाधव यांचा घरात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. (Police in Maharashtra s Thane district murdering a 25 year old youth Aakash Thube lives in vasant Vihar area )
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश गोडे म्हणाले, गुरुनाथ काकड्या जाधव, करण अनिल सावरा आणि प्रशांत उर्फ बाबू मारुती जाबेर अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आकाश ठुबे असे मृताचे नाव असून तो वसंत विहार परिसरात राहणारा आहे. पैशाच्या वादातून 29 ऑगस्ट रोजी जाधव यांचा घरात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. मृत तरूण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संबंधित होता. आरोपींनी मयताच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून मृतदेह टेकडीजवळ जाळून टाकला. तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या), २०१ (पुरावा गायब करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतही संशयावरून खून
मुंबईतील चेंबूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने त्याला असलेल्या संशयावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या करून त्याच्या शरीराचे चार तुकडे केले. शफीक शेख असे आरोपीचे नाव असून, इश्वर मारवाडी उर्फ इश्वर ललित पुत्रान असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मुंबईतील चेंबुरमधील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या आरोपी शफी अहमद अब्दुल माजिद शेख (32) या रिक्षाचालकाने ईश्वर मारवाडी उर्फ ईश्वर ललित पुत्रान या 17 वर्षीय युवकाची हत्या केली. या हत्येनंतर त्याने त्याच्या मृतदेहाचे चार तुकडे करून ते घरातच लपवले होते. मृत ईश्वर मारवाडी याच्या शरिराचे चार तुकडे करण्यात आले होते. त्याचे डोके, दोन हात कापले होते. सोमवारी ही हत्या करून दोन पिशव्यांमध्ये हात आणि डोके तर शरीर एका कपड्याने बांधून ठेवलं होतं.