News By अरुण सावरटकर
मुंबई : छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात युट्युबर रणवीर अलाहाबादीयाने वादगस्त विधान केले होते. रणवीरने एका स्पर्धकांशी संभाषण करताना ते आक्षेपार्ह विधान केले होते. रणवीरच्या त्या कृत्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी देखील गुन्हा नोंद केला होता. सायबर पोलिसांनी रणवीरसह 40 जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स केले होते. याप्रकरणी आज (24 फेब्रुवारी) युट्युबर रणवीर अलाहाबादीया आणि आशिष चंचलानी महाराष्ट्र सायबरच्या महापे येथील कार्यालयात जबाब नोंदवणयासाठी हजर झाले. सायबर पोलिसांनी त्या दोघांचा जबाब नोंदवला. (Police record statement of Ranveer Allahabadia and Ashish Chanchlani in connection with controversial statement on India Got Talent)
महाराष्ट्र सायबर विभागाने युट्युबर रणवीरला चौकशीसाठी समन्स केले होते. मात्र रणवीर हा जबाब नोंदवण्यासाठी येत नव्हता. रणवीरला धमक्या येत असल्याने तो जबाब नोंदवण्यासाठी येताना त्याला अडचणी येत असल्याचे त्याच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्र सायबरने पुन्हा समन्स काढून जबाब नोंदवण्यासाठी यावे असे सांगितले. आज रणवीर आणि आशिष हे दोघे साडे अकरा वाजता महाराष्ट्र सायबरच्या महापे येथील कार्यालयात आले. पोलिसांनी त्या दोघांचा जबाब नोंदवला. रणवीरने काळा मास्क घातला होता. सायंकाळी 5 वाजता तो सायबर कार्यालयातून निघाला. त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास आशिष देखील जबाब नोंदवून बाहेर पडला. तर अभिनेत्री राखी सावंतला 27 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यासाठी पोलिसांनी समन्स केले आहेत.
हेही वाचा – Crime News : खालापुरातील छमछमवर पोलिसांची छापेमारी, स्वागत पूनम समुद्रा बारवर छापे
#WATCH | Mumbai, Maharashtra | India’s Got Latent case: YouTuber Ashish Chanchlani leaves from Mumbai Cyber Crime office after recording his statement. pic.twitter.com/kZk93D8E47
— ANI (@ANI) February 24, 2025
काय प्रकरण आहे?
युट्यूबर रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये पालकांवर अपमानास्पद टिप्पणी केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. रणवीर, समय रैना, अपूर्व मुखिजा आणि इतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर सेल देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही रणवीर इलाहाबादिया यांनाही फटकारले आहे. या वादामुळे इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल वाढती चिंता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
हेही वाचा – Nashik : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टोळक्याचा राडा; अपघात कक्षात दगडफेक, तोडफोड