Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमNew India Cooperative Bank : 122 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण, माजी सीईओसह दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

New India Cooperative Bank : 122 कोटींचे गैरव्यवहार प्रकरण, माजी सीईओसह दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

Subscribe

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन याला गुरुवारी (20 फेब्रुवारी) आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्यासह याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेले बँकेचे महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद्र मेहता आणि विकासक धर्मेश जयंतीलाल पौन यांना आज (21 फेब्रुवारी) किल्ला न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

News by अरूण सावरटकर

मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन याला गुरुवारी (20 फेब्रुवारी) आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्यासह याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेले बँकेचे महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद्र मेहता आणि विकासक धर्मेश जयंतीलाल पौन यांना आज (21 फेब्रुवारी) किल्ला न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Police remand of both accused including former CEO in New India Cooperative Bank fraud case of Rs 122 crore)

हितेश मेहता याच्या कार्यालयातून पोलिसांनी 2 लाख 8 हजार 340 रुपयांची कॅश जप्त केली आहे. न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटींचा अपहार केला होता. ही कॅश त्याने गोरेगाव आणि प्रभादेवी येथील शाखेकडून घेतली होती. हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल होताच हितेशला त्याच्या दहिसर येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा – Verdict : कोर्ट म्हणते- अनोळखी महिलेला तुम्ही स्मार्ट आहात, गोऱ्या आहात…; असा मेसेज पाठवणे म्हणजे अश्लीलता

तपासात हितेशने इतर आरोपींच्या मदतीने हा संपूर्ण गैरव्यवहार केल्याचे उघड केले. त्यापैकी 70 कोटी 50 लाखांची कॅश त्याने धर्मेशला मे ते डिसेंबर 2024 आणि डिसेंबर 2025 या कालावधीत दिली होती. या गुन्ह्यांत धर्मेशचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत दोघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर शनिवारी 15 फेब्रुवारीला पोलिसांनी त्यांना अटक केली. या दोघांनाही न्यायालयाने 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याचदरम्यान दोन दिवसांपूर्वी बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोन याची पोलिसांनी चौकशी करून जबानी नेांदवून घेतली होती. त्याला या गैरव्यवहाराची माहिती होती, मात्र ती माहिती त्याने उघड केली नाही.

ऑडिटमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याने ती माहिती उघड होऊ दिली नाही. चौकशीत अभिमन्यूने हितेश आणि धर्मेश यांच्यावर आरोप केला होता. याच गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. याचवेळी पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने हितेश आणि धर्मेश यांनाही हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांनाच्याही पोलीस कोठडीत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.

हेही वाचा – Share Market Investment : गुंतवणुकीच्या नावाने तीन कोटींना गंडा, एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल