घरक्राइमPorn apps Case : राज कुंद्रापाठोपाठ आणखी एका आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची...

Porn apps Case : राज कुंद्रापाठोपाठ आणखी एका आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Subscribe

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात मुंबई पोलिसांनी उद्योगपती राज कुंद्रापाठोपाठ आणखी एका आरोपीला अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केल्यानंतर जवळपास १० तासांच्या आतच क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. रायन जाँर्न थाँर्प असे या आरोपीचे नाव असून हा नेरूळचा राहणारा आहे. मालवणी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

याप्रकरणात महत्वाचा वॉन्टेड आरोपी प्रदीप बक्षीसोबतचे व्हाट्सप चॅटिंग गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. ‘H अकाउंट’ या नावाने ग्रुप बनवण्यात आला होता ज्यामध्ये सगळ्या व्यवहाराची माहिती देण्यात येत होती.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी अश्लील चित्रपटांची निर्मिती करत अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या मालाड मढमधील एका रॅकेटचा काही दिवासांपूर्वी पर्दाफाश केला. याच प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव समोर आले होते. यावेळी त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. ही चौकशी सुमारे सात ते आठ तास सुरु होती. त्यानंतर पोलिसांनी काल कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. यानंतर आज पुन्हा एका आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. राज कुंद्राला आज (२० जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. कुंद्राविरोधात आयटी अॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास दोषी कुंद्राला अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागू शकते. कारण भारतात पोर्नोग्राफी आण पोर्नोग्राफिक कंटेंट प्रकरणी कडक कायदे आहेत. अशा प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीविरोधात आयटी अॅक्टसोबतचं भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे अनेक होणाऱ्या गुन्हांना रोखण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

नेमके प्रकरण काय आहे?

मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात मालाड मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकत पॉर्नोग्राफिक शुटिंगप्रकरणी मोठी कारवाई केली होती. या बंगल्यात पॉर्नोग्राफिकची शुटिंग सुरु होती. त्यावेळी पोलिसांनी या ठिकाणाहून पाच जणांना अटक केली. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात आपले करियर घडवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात त्या अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासादरम्यानचं उद्योगपती राज कुंद्राचे नाव समोर आले.


शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरणाचा आरोप


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -