घर क्राइम पोस्टरमध्ये अतिक अहमद आणि अश्रफचा 'शहीद' उल्लेख; बीडमध्ये तिघांना अटक

पोस्टरमध्ये अतिक अहमद आणि अश्रफचा ‘शहीद’ उल्लेख; बीडमध्ये तिघांना अटक

Subscribe

बीड : उत्तरप्रदेशमधील माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात पोस्टर्स लावण्यात आले असून त्यात त्यांचा शहीद असा उल्लेख करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही याप्रकरणी कारवाई केली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अतिक आणि अश्रफ यांच्या पोस्टरप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २९३, २९४ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दोन्ही भावांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजीचे वृत्त समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली होती. विहिंप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन सुरू केले. पोलिसांनी पोस्टर्सची माहिती मिळताच त्यांनी ते हटवले आहेत.

- Advertisement -

बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावून या दोघांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. हे पोस्टर मोहसीन भैय्या मित्र मंडळाने लावल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून पोलीस मोहसीन पटेलचा शोध घेत आहेत. (Posters were put up in support of Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed in Majalgaon of Beed to publicly protest the killing of the two)

आतिक-अश्रफ यांची गोळ्या झाडण्यात आली
शनिवारी (15 एप्रिल) रात्री प्रयागराज येथील केल्विन रुग्णालयात उपचारासाठी नेले असता रुग्णालयाबाहेर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. दोघेही पोलीस बंदोबस्तात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी मिडिया कर्मचाऱ्यांच्या वेषात आलेल्या तीन मारेकऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर हे हत्याकांड घडवून आणले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून अरुण, सनी आणि लवलेश तिवारी यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अतिक खून प्रकरणानंतर जोरदार वाद सुरु आहे. राजकीय वर्तुळातून या घटनेप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्रातील बीडमधील लागलेल्या पोस्टरच्या घटनेनेही वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -