घरक्राइमनितीन गडकरींना धमकी देणाऱ्या पुजारीला नागपूरवरून बेळगावला हलवलं; काय कारण? वाचा-

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या पुजारीला नागपूरवरून बेळगावला हलवलं; काय कारण? वाचा-

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून धमकी देणारा कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारीला नागपूर पोलिसांनी अटक केली होती.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी देणारा कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारी यास नागपूर कारागृहातून बेळगाव कारागृहात हलविण्यात आले आहे. यामागील कारण म्हणजे त्यांनी आपल्याला बेळगाव कारागृहात पाठवावे अशी याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यास बुधवारी रात्री बेळगावला सोडण्यात आले आहे. (Pujari who threatened Nitin Gadakari transferred from Nagpur to Belgaum what cause read-)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून धमकी देणारा कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारीला नागपूर पोलिसांनी अटक केली होती. तो मागील अनेक दिवसांपासून तो नागपूरच्या कारागृहात होता. यादरम्यान त्याने नागपूर न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला नागपूर एवजी बेळगावातील कारागृहात पाठवा अशी विनंती केली होती. सोबतच जयेश पुजारी विरोधात कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून, त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचा तपास ही सुरू आहे. अनेक प्रकरण कर्नाटकातील न्यायालयात जयेश पुजारी आणि त्याच्या सहकारी दहशतवाद्यांना विरोधात सुरू आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जयेश पुजारीला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अजितदादा गटावर फसवणुकीच्या कायद्यान्वये कारवाई करा; शरद पवार गटाची मागणी

बेळगावच्या कारागृहात मग मज्जाच मज्जा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारी याने स्वतःहून नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे नागपूर एवजी बेळगाव कारागृहात पाठवा अशा विनंतीची याचिका दाखल केली होती. यामागील कारणही जरा मजेशीर असून, त्याला बेळगावच्या कारागृहात कशा पद्धतीने विविध सोयीसुविधा, इंटरनेट असलेला मोबाइल फोन आणि चमचमीत खाद्यपदार्थ मिळत होते, हे यापूर्वीच्या तपासात पुढे आले होते. त्यामुळे तीच मज्जा कारागृहात राहून करता यावी यासाठी तो हे सर्व खेळ करत असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ओबीसींबाबत भूमिका घेताना वेळकाढूपणा अजिबात नको…, वडेट्टीवारांनी सरकारला खडसावले

लोखंडी तार खाल्ल्याचा केला होता कांगावा

कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारी हा पोलिसांची नस पकडण्यात माहिर आहे. त्याला कारागृहात राहण्याचा जणू सरावच असल्याचे त्याच्या वर्तनावरून दिसून येते. कारण, तो नागपूर कारागृहात असताना त्याने जेलमधील बराकमधील लोखंडी गजांना लावलेल्या बारीक तारीचे तुकडे गिळून मी लोखंडी तार खाल्ल्याचा कांगावा केला होता. मात्र वैद्यकीय तपासानंतर हा प्रकार खोटा असल्याचे उघड झाले होते. एकुणच जयेश पुजारी हा जेल प्रशासनाला वेठीस आणणारा गुन्हेगार आहे एवढे मात्र खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -