Homeक्राइमPune Crime : पाहुणा बनून आला अन् 2 मुलांवर केले अत्याचार; आळंदीतील...

Pune Crime : पाहुणा बनून आला अन् 2 मुलांवर केले अत्याचार; आळंदीतील खासगी संस्थेतील धक्कादायक प्रकार

Subscribe

पुणे : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये अनेक लैगिंक अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शनिवारी (4 जानेवारी) मध्यरात्री एका खासगी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला असून याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहेत. (Pune Crime Alandi 2 children physically abuse in private institution)

हेही वाचा : Santosh Deshmukh Murder Case : मारहाणीत वापरलेले गॅस पाईप, लोखंडी वायर, फायटर पोलिसांकडून जप्त 

समोर आलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय तरुण पाहुणा बनून संबधित खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत आला होता. तरुणाने संस्थेत शिकणाऱ्या दोन मुलांवर 12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार शनिवारी (4 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. महेश मिसाळ असा या तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदीच्या वडगाव रस्त्याला एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये महेश मिसाळ हा पाहुणा म्हणून आला होता. मुलांवर अत्याचार झाल्याची माहिती शिक्षकांना मिळाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी आळंदी पोलिसांनी मुख्य आरोपी महेश मिसाळसह त्याच्या बहिणीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या दोघांनाही अटक केली असून आळंदी पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. यापूर्वी ताने कधी असे प्रकार केले आहेत का? यासंदर्भात पोलीस त्याची चौकशी करत आहेत. पण घटनेमुळे या खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेप्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच आरोपींन कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.