घरक्राइमPune Crime : पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच; क्रिकेट खेळताना वाद झाला अन्...

Pune Crime : पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच; क्रिकेट खेळताना वाद झाला अन्…

Subscribe

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे आता गुन्ह्यांचे माहेरघर होताना पाहायला मिळात आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा पुण्यातील कात्रज परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. क्रिकटे खेळताना  दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Pune Crime Firing session continues in Pune Firing due to an argument while playing cricket)

हेही वाचा – Nargis Antule : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचे निधन

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज भागात राहणाऱ्या 2 तरुणांच्या गटात मंगळवारी (19 मार्च) क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटातील तरुण बुधवारी पुन्हा एकदा भेटले. मात्र दोन्ही गटातील तरुणांमध्ये पुन्हा वाद झाला झाला आणि एका गटातील तरुणाने दुसऱ्या गटातील तरुणावर बंदूक ताण गोळीबार केला. मात्र सुदैवाने ती गोळी तरुणाला लागली नाही. गोळीबार होताच दुसऱ्या गटातील तरुणांसह तिथून पळ काढला. यावेळी 2 तरुण जखमी झाले. याप्रकरणई पोलिसांना काही तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे एका गटातील तरूण हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हेही वाचा – Nargis Antule : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचे निधन

- Advertisement -

पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरुच

दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच पुणे जिल्ह्यात गोळीबारीच्या दोन घटना घडल्या आहेत. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणावर 16 मार्च रोजी गोळीबार झाला होता. तर चाकण शहरापासून काही अंतरावर असलेल्या रासे फाटा परिसरातील मराठा हॉटेलमध्ये तरुणावर 19 मार्च रोजी गोळीबारीची घटना घडली होती. मराठा हॉटेलमध्ये मृत स्वप्नील संजय शिंदे बसला असताना तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने हल्लाही केला. राहुल पवार, अजय गायकवाड आणि एक अज्ञात व्यक्ती अशी आरोपींची नावे असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -