घरक्राइमPune crime: पतीने पत्नीला जीवे मारण्यासाठी औषधाच्या गोळीतून दिले ब्लेड; पोलिसांकडून अटक

Pune crime: पतीने पत्नीला जीवे मारण्यासाठी औषधाच्या गोळीतून दिले ब्लेड; पोलिसांकडून अटक

Subscribe

पुणे : पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. पण आता पुण्याचे ओळख बदलून क्राइम सिटी होऊ लागली आहे. पुण्यात कोयता गँगची दहशत वाद वाढत आहे. महिलांवरील अत्याचार वाढला आहे. पुण्यात पतीने पत्नीला ब्लेड खाऊ घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार पत्नीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

या आरोपचे नाव सोमनाथ साधू सपकाळ (वय 54) असे असून पतीनेचे नाव छाया सोमनाथ सपकाळ (वय 42) यांनी पोलिसांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सोमनाथ हा पत्नी छायाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून पती नेहमी पत्नीला मारहाण करून तिचा छळ करत असे. यानंतर पती सोमनाथने पत्नी छायाला जीवे मारण्याचा कट रचला. यासाठी पतीने औषधी गोळ्यात ब्लेड टाकून पत्नी छायाला खाण्यास दिल्या. पत्नी छायाला ब्लेड गिळायला त्रास होऊ लागला. पत्नी सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल घेतली. यानंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पती सोमनाथला अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – 17 वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पुण्यात पळून आली; आरपीएफ जवानाने डांबून ठेवत केले अत्याचार

आरपीएफकडून मुलीवर बलात्कार

नुकतेच प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (RPF) बलात्कार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे आरपीएफ जवानाने मुलीला पाच डांबून ठेवले होते. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरपीएफ जवानांसह आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -