Eco friendly bappa Competition
घर क्राइम नराधम बाप : 8 दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात कोंबला तंबाखू अन्...

नराधम बाप : 8 दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात कोंबला तंबाखू अन्…

Subscribe

लागोपाठ तिसरी मुलगी झाली म्हणून एका बापाने आपल्याच मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली आहे आणि मुलीचा मृत्यू हा आजाराने झाल्याचा बनाव त्यानं रचला. दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगी झाली त्यामुळे संतप्त झालेल्या बापाने 8 दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली, अशी खळबळजनक बाब समोर आली आहे.

पुणे: बाप लेकीचं नातं खूप जिव्हाळ्याचं नात असतं. त्या नात्याला हादरवून टाकेल अशी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. सोबतच संतप्त प्रतिक्रियादेखील समोर येत आहेत. बापाने आपल्या 8 दिवसांच्या मुलीचीच हत्या केली आहे. या नराधम बापाने अतिशय क्रुरतेने आपल्या मुलीला संपवलं. (Pune Crime news  Murderous father 8 day old girl s mouth put tobacco and murdered Vakod Harinagar )

लागोपाठ तिसरी मुलगी झाली म्हणून एका बापाने आपल्याच मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली आहे आणि मुलीचा मृत्यू हा आजाराने झाल्याचा बनाव त्यानं रचला. दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगी झाली त्यामुळे संतप्त झालेल्या बापाने 8 दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली, अशी खळबळजनक बाब समोर आली आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला तत्काळ अटक केली आहे. गोकूळ जाधव, (वय 30) असं नराधम आरोपीचं नाव आहे.

- Advertisement -

वाकोड येथील हरिनगर तांडा येथे आरोपी गोकुळ जाधव, त्याची पत्नी आणि दोन मुलींसह राहात होता. त्याची पत्नी तिसऱ्या वेळी गरोदर होती. 2 स्पटेंबर रोजी वाकोड प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती झाली. मात्र तिसऱ्या वेळीही त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली. यामुळे संतापलेल्या गोकुळने 10 सप्टेंबर रोजी तिचा जीव घेतला. अवघ्या 8 दिवसांच्या लेकीच्या तोंडात त्यानं तंबाखू भरून तिला झोपवले. त्यातच तिचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. मुलीच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा कर्मचारी त्यांच्या घरी गेली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

असा आला गुन्हा उघडकीस

जाधव यांच्या घरी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माची नोंद करण्यासाठी आशा कर्मचारी त्यांच्या घरी गेली होती. मात्र तेव्हा मुलगी घरात नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तेव्हा त्या कर्मचारी महिलेने याप्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. त्यानंतर डॉक्टर संदीप कुमावरत हे वैद्यकीय अधिकारी मंगळवारी गावात पोहोचले आणि त्यांनी जाधव यांच्याकडे मुलीबद्दल विचारलं. तेव्हा आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं. मात्र डॉक्टरांना त्याचा संशय आला आणि त्यांनी कसून चौकशी केली, त्यानंतर त्यानं आपला गुन्हा कबूल केला.

- Advertisement -

अवघ्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला पाळवण्यात झोपवले, त्यातच त्या मुलीचा मृत्यू झाला. तसंच फर्दापूर ते वाकोड या रस्त्यावर खड्डा खणून रात्रीच्या सुमारास त्यात लेकीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक कबुलीह त्यानं दिली. याप्रकरणी आता जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.

(हेही वाचा: संशयाचं भूत डोक्यात शिरलं; दगडाने ठेचूनच उतरलं; रक्तरंजित घटनेने कोल्हापूर हादरले )

- Advertisment -