घरक्राइमPune Crime : दारूच्या नशेत 8 गाड्यांची तोडफोड; दोघांना अटक

Pune Crime : दारूच्या नशेत 8 गाड्यांची तोडफोड; दोघांना अटक

Subscribe

पुणे : एकेकाळी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. रोज गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. वाहन तोडफोडीचे सत्रही नियमित सुरू आहे. गुरुवारी (28 फेब्रुवारी) रात्री पुण्यातील मुंढवा भागात आरोपींनी दारूच्या नशेत 8 गाड्यांची तोडफोड केली आहे. हा सगळा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. (Pune Crime Vandalism of 8 cars in drunkenness Both were arrested)

हेही वाचा – Padmabhushan : एकाने पद्मभूषण चोरले, तिघे विकायला गेले अन् सोनाराच्या हुशारीमुळे अडकले

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून येरवडा आणि मुंढवा परिसरात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे. आरोपींकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोपींचा लवकरच बंदोबस्त करावा, अशी मागणी ते पोलिसांकडे वारंवार करताना दिसत आहेत. अशातच गुरुवारी पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली. येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणांनी वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी येरवडा पोलिसंकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजय चित्रगुप्त बागरी, सुमीत भारत सितापराव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – Padmabhushan : एकाने पद्मभूषण चोरले, तिघे विकायला गेले अन् सोनाराच्या हुशारीमुळे अडकले

- Advertisement -

पोलीस गुन्हेगारांवर ठेवणार गुन्हेगारी नजर

पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. त्यांनी नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अट्टल गुन्हेगारांची परेड काढली होती. कोयता गॅंग किंवा तोडफोड करणाऱ्या टोळीची धींडदेखील काढली होती. तसेच गुन्हेगारांना कारवाई करण्यासंदर्भात सक्त तंबी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही गुन्हेगारी होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस आता गुन्हेगारांवर डिजिटल नजर ठेवणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -