घरक्राइमजीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार अत्याचार ; आरोपीला अटक

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार अत्याचार ; आरोपीला अटक

Subscribe

पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरात जीवे मारण्याची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार केला जात होता. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी स्वागरेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी 19 फेब्रुवारी रोजी शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रम संपवून ती घरी आली आणि नेहमीप्रमाणे घरात कपडे बदल होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर पीडितेचे अपहरण करून तिला मुंबईत पळवून आणल्याचीही धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisement -

जुलैमध्ये पीडितेचे आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने अपहरण पीडितेचे अपहरण केले, त्यानंतर तिला मुंबईत आणले. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. महेश मोरे असं या आरोपीचे नाव आहे. तसेच तो पीडितेच्या अगदी बाजूला राहणारा होता.

स्वारगेट पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यावेळी उपचारादरम्यान पीडितेने सांगितले की, तिच्या शेजाऱ्याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला, त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीतही पीडितेवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्याने. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आता स्वारगेट पोलिस करत आहेत.


Video : सपा नेत्याच्या कारला अज्ञात वाहनाची जोरदार धडक; 500 मीटरपर्यंत नेले फरफटत; आरोपीला अटक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -