Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला करायचे होते नपुसंक; चाणाक्ष पतीने उधळून लावला डाव

बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला करायचे होते नपुसंक; चाणाक्ष पतीने उधळून लावला डाव

Related Story

- Advertisement -

लग्नाच्या काही दिवसांनंतरच पहिले प्रेम पुन्हा आठवले आणि एका निर्दोष पतीचे आयुष्य उध्वस्त होता होता वाचले. एका पत्नीने आपले पहिले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने विधीवत लग्न केलेल्या पतीलाच थेट नपुसंक बनविण्याचा कट रचला. मात्र चाणाक्ष पतीच्या चलाखीमुळे त्याला वेळीच या कटाचा सुगावा लागला आणि त्याचे आयुष्य वाचले. आता आरोपी पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड दोघांवरही वारजे माळवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगदी सावधान इंडिया किंवा वेब सिरीजला साजेशी अशी ही घटना पुण्यात घडलीये.

आरोपी पत्नी आणि तिच्या पतीचे याचवर्षी मार्च महिन्यात लग्न झाले होते. पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि पत्नी मॅकेनिकल इंजिनिअर आहे. दोघेही उच्चशिक्षित असून पुण्यातील मोठ्या कंपनीत करतात. मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या पत्नीचे आधीपासूनच तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या युवकाशी प्रेमसंबंध होते. मात्र लग्नात नाना अडचणी असल्यामुळे त्यांना एक होता आले नाही. त्यामुळे दोघांनीही राजीखुषी ब्रेकअप करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र काही महिन्यांपूर्वी दोघांची कंपनीतच पुन्हा भेट झाली आणि पहिल्या प्रेमाची आठवण त्यांना छळायला लागली. यातूनच ते पुन्हा पुन्हा भेटू लागले. आता त्यांनी एकत्र होण्याचा निर्णय घेतला. पतीला नपुसंक बनवून आपण एकत्र येऊ असा कट त्यांनी रचला.

- Advertisement -

लग्नानंतर पत्नीने पतीला महाबळेश्वरला घेऊन जाण्याचे नियोजन केले. तिथे पोहोचल्यावर आपला मित्र येथेच राहतो असे सांगून पत्नीने पतीला बॉयफ्रेंडची ओळख करुन दिली. मात्र पतीने काही दिवसांपासून त्याच्या घराच्या आसपास फिरणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला ओळखले. महाबळेश्वरला असताना तिघांनी एकत्र पार्टी देखील केली. आपल्या मित्राची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आहे, नवीन नोकरी मिळेपर्यंत त्याला काही दिवस आपल्या पुण्यातील घरात राहण्याची परवानगी देऊ, अशी विनवणी पत्नीने पतीला केली. पतीनेही होकार देऊन टाकला.

महाबळेश्वरहून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीचा बॉयफ्रेंड त्यांच्या पुण्यातील घरी आला. तेव्हा पतीचा संशय बळावला. काही दिवसांनी त्याने पत्नीच्या मोबाईलमधील महाबळेश्वरचे फोटो पाहायचे असल्याचा बहाणा करुन मोबाईल मागितला आणि त्यातील चॅटिंग तपासले. तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण पत्नी आणि तिचा प्रियकर पती झोपेत असताना त्याची गुप्तांगाची नस कापण्याचे नियोजन करत होते. त्याबद्दल त्यांनी चर्चा केल्याचे चॅट पतीने वाचले.

- Advertisement -

चॅट वाचून गांगरलेल्या पतीने बाहेरगावी जायचे असल्याचे सांगून आपल्या मूळ गावी पळ काढला. तिथे कुटुंबाच्या कानावर सर्व प्रसंग टाकला आणि त्यानंतर रितसर पोलीस स्थानकात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत यांनी ते चॅट वाचलण्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती दिली. पतीचा काटा काढण्यासाठी त्याला ठार न करता नपुसंक बनवून तिघांनीही एकत्र राहण्याचा प्लॅन दोन्ही आरोपींनी केला होता. आता दोघेही तुरुंगाची हवा खात आहेत.

- Advertisement -