Eco friendly bappa Competition
घर क्राइम सुधागड तालुक्यात 'पुष्पा' गॅंग सक्रिय, खैरांच्या लाकडांची होतेय तस्करी?

सुधागड तालुक्यात ‘पुष्पा’ गॅंग सक्रिय, खैरांच्या लाकडांची होतेय तस्करी?

Subscribe

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जंगलातून खैराशीच्या झाडाच्या लाकडांची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या झाडाच्या लाकडाचा वापर हा गुटखा बनविण्यासाठी केला जातो.

रायगड : अंदाजे एका वर्षापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जून याने अभिनय केलेला पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्या चित्रपटातील चंदन तस्करी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, यामध्ये तस्करी करणाऱ्या पुष्पाला पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशीच काहीशी तस्करी सुधागड तालुक्यातील काही भागात होत असल्याची चर्चा तालुक्यात ऐकाला मिळत आहे. विशेष म्हणजे येथे चंदनाची तस्करी होत नाही. गुटखा बनविण्यासाठी ज्या झाडाचा वापर केला जातो, त्या खैराशी नावाच्या झाडांची तस्करी होत असल्याचे बोलले जात आहे. (‘Pushpa’ gang active in Sudhagad taluka, smuggling of Khair wood?)

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’ला ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष’ पूरक, अजित पवारांच्या कार्यालयाचा खुलासा

- Advertisement -

खैराशीची झाडे ही जंगल परिसरात असतात. या झाडाच्या लाकडांचा वापर हा गुटखा बनविण्यासाठी केला जातो. ती झाडे हळूहळू दुर्मिळ होत चालली असली तरी सुधागड तालुक्यातील काही भागातील जंगल परिसरात खैराशी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक लोकांना हाताशी धरून काही तस्कर खैराशी झाडांची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

जंगल परिसरात खैराशी झाडांची अवैधरित्या कत्तल होत असल्याची माहिती समोर आली असून दुर्मिळ झाडांपैकी एक असलेल्या खैराशी झाडाची तस्करी होण्याचे प्रमाण काही महिन्यांपासून वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबतची चर्चा देखील सुधागड तालुक्यात सुरू आहे. तालुक्यात जंगल परिसर मोठ्या असल्याने रात्रीच्या वेळी खैरांच्या लाकडांची अवैधरित्या तस्करी केली जात आहे. अवैध खैरांच्या लाकडांची तस्करी करणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नसल्याचे ही चर्चा सुधागड तालुक्यात सुरू आहे.

- Advertisement -

तसेच परवानगी न घेता दुर्मिळ असलेल्या खैराच्या झाडाची तोडही बेकायदेशीर आहे, ही तस्करी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या खरोखर निदर्शनास येत नाही का? असा सवाल उपस्थित या निमित्ताने उपस्थित होत आहे. कमी वेळेत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने तस्करीचे प्रमाण वाढले असून हे रोखण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ह्या अवैधरित्या खैरांच्या झाडांची तोड करणाऱ्यांवर वनविभाग कारवाई करून सुधागड तालुक्यात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देणार का? याकडे संपूर्ण सुधागड तालुक्याचे लक्ष लागून आहे.

तर याबाबत सर्व वनपाल यांना तत्काल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशा अवैधरित्या वृक्षतोड करून अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे सुधागड-पालीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी विकास तरसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -