Homeक्राइमOnline Fraud : रेल्वे अधिकार्‍याची ऑनलाईन फसवणूक, दोघांना अटक

Online Fraud : रेल्वे अधिकार्‍याची ऑनलाईन फसवणूक, दोघांना अटक

Subscribe

मुंबई : सायन परिसरातील एका रेल्वे अधिकार्‍याची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना चेन्नई येथून सायन पोलिसांनी अटक केली. कार्थिक विश्‍वनाथन आणि नंदकुमार कुमारन अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी चार मोबाइल, सहा सिमकार्ड, तीन डेबीट कार्ड जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (railway officer was molested online, two arrested)

या प्रकरणातील तक्रारदार सायन येथे राहत असून रेल्वेमध्ये अधिकारी आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांचा मोबाईल हॅक झाला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 19 ऑनलाईन व्यवहार होऊन एक लाख रुपये डेबिट झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायन पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने चेन्नई येथून चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर कार्थिक आणि नंदकुमार या दोघांना अटक करुन पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात आले होते.

हेही वाचा – Saif Ali Khan Attack Case : मोहम्मद शहजादच खरा आरोपी, फेस रेकग्निशन अहवाल आला समोर

या दोघांकडून मोबाइल, सिमकार्डसह गुन्ह्यांतील सत्तर हजार पोलिसांनी जप्त केले आहे. तपासात ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडले होते. या खात्यांचा काही विदेशी सायबर ठगांकडून फसवणुकीसाठी वापर होत होता. त्यासाठी या दोघांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती. त्यांनी आतापर्यंत तीन बँकेत खाती उघडले आहे. त्यात कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाली आहे. या टोळीविरुद्ध आतापर्यंत विविध राज्यातील शंभरहून अधिक ऑनलाईन तक्रारी सायबर क्राईम पोर्टलवर मिळाल्या आहेत.

हेही वाचा – SIT : फडणवीस – शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा होता कट, तपासासाठी SIT ची स्थापना


Edited by : Ashwini A. Bhatavdekar