Raj Kundra pornography case: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर १० ऑगस्टला होईल सुनावणी, पोलिसांना नोटीस जारी

Raj Kundra Case shilpa shetty husband raj kundra gets relief from supreme court in porn films racket case
Raj Kundra Case: : राज कुंद्राला सुप्रीम कोर्टाचा दिलासा! अटकेला ४ आठवड्यांची स्थगिती

पॉर्न व्हिडिओ निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा याच्यासमोर अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अशातच आता राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांच्या जामीन अर्जावर १० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गुरुवारी दोघांच्या जामीन अर्जावर पोलिसांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांचा जामीन अर्ज यापूर्वी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर दोघांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालय़ात दाखल केली. या याचिकेत जामीनासाठीचा अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र आजच्या सुनावणीतही जामीनावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

गुन्हे शाखेला मिळाले ५१ पॉर्न व्हिडिओ

पॉर्न व्हिडिओंची निर्मिती करत ते विविध पॉर्न अॅपवर प्रदर्शित केल्या प्रकरणी राज कुंद्रा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. यात दिवसेंदिवस याप्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. एका अहवालात सरकारी वकील अरुणा यांनी सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेला हॉट शॉट्स आणि बॉलीफेम या दोन अॅप्सवरून ५१ पॉर्न सिनेमे मिळाले आहेत. तसेच राज कुंद्राकडून त्याचा मेहुणा प्रदीप बक्षी याला पाठवलेला एक ईमेल मिळाला आहे.

शिल्पाने केली इन्स्टाग्राम पोस्ट

या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिल्पाने लिहिले आहे की, ती आतापर्यंत या प्रकरणावर गप्प राहिली आणि यापुढेही राहील. तसेच शिल्पाने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, तिला याप्रकरणी विनाकारण ट्रोल केलं जातयं. मात्र मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार माध्यमांनी करावा असे आवाहनही तिने केलं आहे. राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. यानंतर त्याच्यावर गुन्हे शाखेला २५ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोपही करण्यात आले आहे.