घरक्राइमRaj Kundra Pornography case: तब्बल 2 महिन्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून राज कुंद्राची...

Raj Kundra Pornography case: तब्बल 2 महिन्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून राज कुंद्राची जामिनावर सुटका

Subscribe

बॉलिवूड(bollywood)अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty)पति राज कुंद्राला(Raj Kundra) 19 जुलै रोजी मुंबई गुन्हेगारी शाखेच्या पथकाने पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मीती आणि वितरण केल्या प्रकरणी अटक केली होती. गेल्या दोन महिन्यापासून राज कुंद्रा तुरुंगात कैद असून काल त्याला जामिन देण्यात आला आहे. नुकतच राज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला आहे.(Raj Kundra released from Arthur Road Jail in Mumbai)

- Advertisement -

माहितीनुसार राज कुंद्रा विरोधात 1500 पानांची चार्टशीट तयार करण्यात आली असून 43 साक्षीदारांचे नाव यात नोंदवण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून  पोलिस  राजची कसून चौकशी करत असून सध्या राज जामीनावर बाहेर आला आहे.

२०२१ मध्ये मुंबई क्राईम ब्रांचने फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफी प्रकरण समोर आले आहे. तेव्हापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान पोर्नोग्राफी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. यात एप्रिल महिन्य़ात ९ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रान्चला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मड भागातील एका बंगल्यात धाड टाकली.त्या बंगल्यात अश्लील चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होते. पोलिसांनी त्या ठिकाणाहून एका महिलेला रेस्क्यू देखील केलं. चित्रपटांमध्ये काम देण्याचं वचन देत पॉर्न व्हिडिओमध्ये काम करण्यास भाग पाडलं. याप्रकरणी अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हे हि वाचा – वादळानंतर सुंदर गोष्टी घडतात…राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पाची भावनिक पोस्ट व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -