भयानक!11 वर्षाच्या चिमुरडीवर सहा अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

ranchi six minors gang assault 11 year old girl in khunti jharkhand
भयानक,11 वर्षाच्या चिमुरडीवर सहा अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

झारखंडमधून बलात्काराची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खुंटी येथे एका लग्नसमारंभात 11 वर्षीय चिमुकलीवर सह अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 19 एप्रिल रोजी तापकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. 11 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रकरणात 6 मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. हे 6 आरोपी 10-16 वयोगटातील आहेत. जबाब नोंदवल्यानंतर सहाही आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन सुधारगृहात करण्यात आली आहे.

खुंटीचे पोलिस अधीक्षक अमन कुमार यांनी सांगितले की, बुधवारी पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलीस तपास सुरू केला. 10 ते 16 वयोगटातील सर्व सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्यांचीा रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभातून तीन मुली त्यांच्या घरी जात होत्या, यावेळी सहा अल्पवयीन मुलांनी यातील एका मुलीला रस्त्यावरून उचलून नेले आणि एका अज्ञात ठिकाणी नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, पीडित मुलीने घरी पोहचत तिच्यासोबत घडलेला प्रकार घरी आईला सांगितला. यानंतर पीडित मुलीच्या आईने तापकरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करत चौकशी सुरु केली आहे. या आरोपींपैकी चार आरोपी पीडितेच्या ओळखीचे होते.

दरम्यान पोलिसांनी सीआरपीसी (गुन्हेगारी प्रक्रिया संहिता) कलम 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर मुलगी, तिचे पालक आणि दोन मित्रांसह पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत.


Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात ही गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया