आई – वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अंबड पोलिसात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

नवीन नाशिक : आई-वडिलांना जीवे  मारण्याची धमकी देत त्रंबकेश्वर येथील एका  हॉटेलमध्ये बळजबरीने घेऊन जात एका १६ वर्षीय अल्पवयीन  मुलीवर तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मजहर अन्वर खान यांने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत दिं २ एप्रिल ते ४ एप्रिल २२ रोजी  त्रेबकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कलमासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अधिक तपास करीत आहेत