घरक्राइमRatnagiri: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत खून; आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत खून; आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Subscribe

खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. बुधवारी या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 19 जुलै 2018 रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. 20 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एका नागरिकाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलीस निरिक्षक अनिल गंभीर व सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण ( वय 29) याला ताब्यात घेतलं. आता या आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला असून, न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. ( Ratnagiri Khed Sukivali gaon Minor girl raped and murdered Accused sentenced to death by session court  )

नेमकं प्रकरण काय?

पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील सुकिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत सरकारी वकिलांचा सत्कार केला आहे.

- Advertisement -

खेड तालुक्यातील सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे 19 जुलै 2018 रोजी श्रुती सतीश चव्हाण या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर शौचालयाच्या टाकीमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला होता. हा आरोपी देखील सुकिवली गावातला आणि तिच्या नात्यात होता.

( हेही वाचा: टोळक्याची भुरटेगिरी, फुकट नाश्ता दिला नाही म्हणून स्वीटच्या दुकानात धुडगूस, कामगारालाही मारहाण )

- Advertisement -

गावकऱ्यांनी केला वकिलांचा सत्कार

या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. बुधवारी या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदर केले. रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनंतर तब्बल पाच वर्षांनंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -