Homeक्राइमSaif Ali Khan Attack Case : मोहम्मद शहजादच खरा आरोपी, फेस रेकग्निशन...

Saif Ali Khan Attack Case : मोहम्मद शहजादच खरा आरोपी, फेस रेकग्निशन अहवाल आला समोर

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शहजाद याची फेस रेकग्निशन टेस्ट (Facial Recognition Test) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शहजाद याची फेस रेकग्निशन टेस्ट (Facial Recognition Test) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादचा सीसीटीव्हीतील चेहरा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आरोपींच्या वकिलांनीही त्यावर प्रश्न उपस्थित करत सीसीटीव्हीतील आरोपी मोहम्मद शहजाद नसल्याचा दावा केला होता. (saif ali khan stabbing case accused mohammad shahzad facial recognition test report comes positive mumbai police investigation)

सिनेअभिनेता सैफ अली खानवरील हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद अमीर फकीर याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांना आणखीन एक पुरावा मिळाला आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात आरोपीसह सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा चेहरा एकाच व्यक्तीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे खर्‍या आरोपीबाबत येणार्‍या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चार दिवसांनी शरीफुलला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली होती. मात्र सैफवर हल्ला करणारा आणि अटक आरोपीचा चेहरा मॅच होत नाही, माझ्या मुलाने सैफअलीवर हल्ला केला नाही असा आरोप त्याच्या वडिलांनी केला होता.

हेही वाचा – Leopard Safari : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार,आशिष शेलार यांची घोषणा

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळून जाणार्‍या आरोपीचे फुटेज आणि शरीफुलचा चेहरा मॅच होत असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यात पोलिसांकडून अधिकृत खुलासा होत नसल्याने याबाबत उलटसुलट बातम्या येत होत्या. याच दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा फोटो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले होते. त्याचा अहवाल अलीकडेच पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात दोन्ही व्यक्ती एकच असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. हा अहवाल नंतर वांद्रे पोलिसांकडे सोपविण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह असल्याने हा पोलिसांसाठी एक भक्कम पुरावा मानला जात आहे. शरीफुलविरुद्ध वांद्रे पोलिसांकडे इतर काही पुरावे असून या पुराव्याच्या आधारे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

आरोपीचा फेस रेकग्निशन अहवाल

अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. यानंतर पोलीस चौकशीत आपल्याला फसवलं जात असल्याचं आरोपी मोहम्मदने म्हटलं. आरोपीच्या कुटुंबियांनीही दावा केला की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला व्यक्ती एक नसून आरोपी वेगळाच आहे. यामुळे आरोपीचा चेहरा आणि सीसीटीव्हीत पळताना दिसलेल्या चोराचा चेहरा यांचं फेस रेकग्निशन करण्यात आला. आता त्याचा अहवाल समोर आला असून सीसीटीव्हीमध्ये पळणारा चोर मोहम्मद शहजाद असल्याचं स्पष्ट झालं आहे.

16 जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात घुसून चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 19 जानेवारी रोजी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. आरोपीचं नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असल्याचं तपासात समोर आले.

हेही वाचा – SIT : फडणवीस – शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा होता कट, तपासासाठी SIT ची स्थापना

आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

यानंतर, मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रेकग्निशन टेस्ट (FRT) करण्याचा निर्णय घेतला. आता एफआरटी अहवाल समोर आला आहे. आरोपी मोहम्मद शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला 11 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.