Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम Sangli Crime: क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईनं फेकलं...

Sangli Crime: क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईनं फेकलं विहिरीत

Subscribe

अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला महिलेने प्रियकराच्या मदतीने संपवलं.

माता न तू वैरिणी त्याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यात आला. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला महिलेने प्रियकराच्या मदतीने संपवलं. या महिलेने आधी चिमुकल्याचं अपहरण झाल्याचा बनाव केला आणि नंतर प्रियकराच्या मदतीने मुलाला विहिरीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना खानापूर तालुक्यातील लेंगर गावात घडली आहे. विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे ( वय 28 वर्षे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे ( वय 25 वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ( Sangali Crime news women throws her a six year old son into a well with the help of boyfriend for obstructing an immoral relationship )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रुपेष घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. त्यातून तिने नवऱ्यापासून वेगळं होण्याचं ठरवले आणि घटस्फोटासाठी अर्ज केला. गेल्या काही दिवसांपासून ती आणि शौर्य वेगळे राहत होते. मात्र, आपल्या प्रियकरा सोबत लग् करण्यासाठी शौर्य तिला नकोसा झाल्यानं तिने आणि तिच्या प्रियकराने शौर्याचा काटा काढायचं ठरवलं.

विटा पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे

- Advertisement -

विहिरीत चिमुकल्या शौर्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रुपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्याचा खून केल्याची कबुली दिली. दोघांची कसून चौकशी सुरु आहे. या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा: धक्कादायक! नाशिक शहरातून ४ महिन्यात ६३५ तरुणी गायब; २३१ अल्पवयीन मुलीही बेपत्ता )

पुण्यातही अशीच घटना

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी पुण्यातून देखील अशीच बातमी समोर आली होती. वैष्णवी महेश वाडेर ( वय 4) असे खून करण्यात आलेल्या चिमुरडीचे नाव होते. या प्रकरणी मुलीची आई कल्पना वाडेर हिला पोलिसांनी अटक केली होती. हडपसर येथील सिद्धीविनायक दुर्वांकर सोसायटी ससाणे नगर येथे ही घटना घडली होती. आरोपी कल्पना आणि तिची चार वर्षांची मुलगी या दोघीच राहत होत्या.

- Advertisment -