घरक्राइमSangli Crime : सांगलीलाही गुन्हेगारीचा विळखा; मालमत्तेच्या वादातून नातवांनी आजीलाच संपवलं

Sangli Crime : सांगलीलाही गुन्हेगारीचा विळखा; मालमत्तेच्या वादातून नातवांनी आजीलाच संपवलं

Subscribe

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत. आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

सांगली : साहित्यनगरी म्हणून ओळख असलेल्या सांगलीलाही आता गुन्हेगारीचा विळखा बसल्याचे चित्र आहे. कारण, मालमत्तेच्या वादातून नातवांनी आईच्या मदतीने आजीलाच संपवल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील तिघांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Sangli Crime Sangli is also known for crime The grandchild killed the grandmother due to a property dispute)

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत. आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.

- Advertisement -

घडलेली घटना ही मालमत्तेच्या वादातून घडल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. कारण चिंचणी येथील सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका निकम यांना होता यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Farmers Protest : भाजपा सरकारचे प्रत्येक धोरण शेतकरीविरोधी – बाळासाहेब थोरात

- Advertisement -

तिन्ही आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी विटा पोलिसांनी मृतक सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना रात्री उशिरा अटक केली.

हेही वाचा : Ameen Sayani : रेडिओ जगतातील जादुई आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन

यामुळे केला खून

मालमत्ते प्रकरणी राग मनात ठेऊन आरोपींनी 19 फेब्रुवारी रोजी संगिता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी जाऊन मालमत्ता नावावर करुन दे, नाही तर तुला आणि म्हातारीला संपवून टाकतो अशी धमकी देऊन हे तिघेही विट्याला निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हे तिघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -