प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या; सीसीटीव्ही फुटेजमधून घटना उघडकीस

saralavastu chandrashekhar guruji murdered in karnataka hubli cctv footage video goes viral on social media

सरल वास्तू या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिषी चंद्रशेखर यांच्या हत्येची घटना मंगळवारी समोर आली आहे. ज्योतिषाचार्य चंद्रशेखर कर्नाटकच्या हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये होते, यावेळी काही लोक त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये पोहचले होते. यावेळी हल्लेखोरांनी प्रथम गुरुजींच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतले, त्यानंतर दुसऱ्याच सेकंदाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्लेखोरांनी गुरुजींवर जवळपास 17 हून अधिक वेळा वार केले आहेत. यातच त्यांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

ज्योतिषी चंद्रशेखर यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. आज दुपारच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी त्यांच्या जवळ येऊन चाकूसारख्या शस्त्राने वार केल्याचे दिसतेय, यामध्ये आरोपी हत्येनंतर घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे.

मात्र हे हल्लेखोर कोण आहेत आणि या हत्येमागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरु केला आहे. चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे बागलकोटचे असून काही कौटुंबिक संबंधामुळे ते हुबळी येथे आले होते. हत्येनंतर पोलीस आयुक्त एल राम, डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था, डीईसीपी गुन्हे आणि वाहतूक ताबडतोब दाखल झाले. आरोपींना पकडण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्याचवेळी मृतदेह KIMS रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


उमेश कोल्हे हत्या प्रकरण; नवनीत राणांच्या आरोपांवर पोलीस आयुक्तांचे उत्तर, ‘हा विषय अतिसंवेदनशील…’