Homeक्राइमSantosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; खासदार...

Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; खासदार सोनवणेंच्या मागणीला यश

Subscribe

बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे पडसाद राज्यात उमटत आहे. हत्येच्या तपासावरही राजकीय नेत्यांनी संशय व्यक्त केला होता. स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली होती. दरम्यान गृहविभागाने संतोष देशमुख हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे. तर केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीड पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची होती मागणी 

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात या घटनेचे पडसाद उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुद्धा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले आहे.

बीड जिल्हा बंदची हाक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती होते. अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले होते. संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना जोरदार मारहाण केली. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा पोस्टमॉर्टममध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. संतप्त ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती.

तीन आरोपींना आतापर्यंत अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी दोन जण फरार आहेत, त्यांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीयांचेही नाव समोर आले आहे.

हेही वाचा : Sanjay Jadhav : दंगल झाली तेव्हा ‘सेफ है’ म्हणणारे कुठे गेले होते? ठाकरे गटाच्या खासदारांचा सवाल

Edited by – Unmesh Khandale